हाफ चड्डी नको, आम्हाला फुल पॅन्ट द्या; शाळेच्या पहिल्याच दिवशी 3 रीच्या विद्यार्थ्यांची डिमांड, शिक्षक म्हणाले..
शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या .त्यावेळी तिसरीतल्या विद्यार्थ्यांनी वेगळीच डिमांड समोर ठेवली . त्यावर शिक्षकांचं उत्तर काय होतं?

Nanded : आम्हाला हाफ चड्डी नको फुल पॅन्ट द्या, हाफ चड्डी घालायला लाज वाटते' नांदेडच्या जिल्हा परिषद शाळेतील तिसरीतल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या डिमांडची सध्या चांगलीच चर्चाय . आज पासून शालेय शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर जि.प . शाळेत तिसरीतल्या पोरांनी केलेली ही वेगळीच मागणीनं लक्ष वेधलं.यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत लोकप्रतिनिधीही उपस्थित होते . विद्यार्थ्यांचा स्वागत करताना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या .त्यावेळी तिसरीतल्या विद्यार्थ्यांनी वेगळीच डिमांड समोर ठेवली .
फुल पॅन्टच्या मागणीवर शिक्षक काय म्हणाले?
नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळा आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरू झाली .विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत शिक्षकांनी त्यांचे स्वागतही केलं .गणवेश वाटप करण्यात आला .मात्र आता तिसरीतल्या विद्यार्थ्यांना गणवेशात मिळणाऱ्या हाफ चड्डीवर आक्षेप आहे .आम्हाला हाफ चड्डी नको फुल पॅन्ट द्या .हाफ चड्डी घालायला लाज वाटते अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे . याविषयी उस्मान नगर जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापिका संगीता वांगे यांना विचारले असता, त्यांनी आम्ही गणवेशात हाफ चड्डी मागच्या वर्षी दिल्या आहेत यावर्षी नाही असं सांगितलं आहे .तर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटणे म्हणाल्या, गेल्या वर्षी बचत गटांना गणवेश शिलाईचे काम दिल्याने सर्व बट्ट्याबोळ झाला होता .आता यावर्षी शालेय व्यवस्थापन समितीला अधिकार देण्यात आले आहेत .विद्यार्थ्यांची मागणी असेल तर पॅन्ट शिवून देऊ अशी प्रतिक्रिया शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे .
शालेय शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झालेली आहे शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे लोकप्रतिनिधी देखील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दाखल झालेले आहेत पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत
MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर
विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता लागलेल्या यूजी NEET (नीट) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता एमएचटी सीईटी पीसीएम (PCM) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. तर, एमएचटी-सीईटी पीसीबी परीक्षेचा निकाल (Results) उद्या जाहीर होणार आहे. त्यामुळे, आज निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर आंनदोत्सव साजरा केला आहे.
हेही वाचा
MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल; इथे पाहाता येईल गुणपत्रिका

























