एक्स्प्लोर

Nanded News : नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या मुलीचे 'भावी आमदार' म्हणून होर्डिंग झळकले!

Nanded News : चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजे माजी मंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया यांचं नाव चर्चेत आलं होत. त्यातच आता नांदेडमध्ये श्रीजया चव्हाण यांचे भावी आमदार म्हणून होर्डिंग झळकले आहेत. 

Nanded News : मागील काही महिन्यांपासून माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा राजकीय वारसदार कोण यावर चर्चा रंगू लागल्या होत्या. याच काळात चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजे माजी मंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया (Shreejaya) यांचं नाव चर्चेत आलं होत. त्यातच आता नांदेडमध्ये (Nanded) श्रीजया चव्हाण यांचे भावी आमदार म्हणून होर्डिंग झळकले आहेत. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारस कोण याचीच चर्चा रंगली होती. त्यात श्रीजया चव्हाण याच अशोक चव्हाण यांच्या वारसदार असतील असं म्हटलं जात होतं. मात्र त्यावर अशोक चव्हाण यांनी राजकारणात तिने यावं का नाही हा तिचा निर्णय असल्याचं माध्यमांना सांगितलं होतं. 

वाढदिवसानिमित्त भावी आमदार आशयाचे होर्डिंग 

गेल्या काही दिवसांत श्रीजया या वडील अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात दिसून आल्या होत्या. तर येत्या 26 मे रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने 'भावी आमदार' अशा आशयाचे शुभेच्छापर होर्डिंग नांदेड शहरात झळकलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होतेय हे नक्की.

भारत जोडो यात्रेतही श्रीजया यांचे बॅनर

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु झाली होती. या भारत जोडो यात्रेतील काँग्रेसच्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांसोबत अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण हिचे देखील बॅनर झळकले होते. तसंच देगलूरपासून राहुल गांधींसोबत या पदयात्रेत श्रीजया चव्हाण चालत होत्या. श्रीजया चव्हाण यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. पोस्टरवरही त्यांचे फोटो दिसत होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेतील त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला होता.

विधानसभा निवडणुकीत दोन्ही मुलींची महत्त्वाची भूमिका

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या अनपेक्षित पराभवामुळे त्यांच्या समर्थकांसह चव्हाण परिवाराला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुलींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तीन वर्षांत चव्हाण यांची जनसंपर्क यंत्रणा श्रीजयाने पडद्यामागून लीलया सांभाळली. तसंच अनेक सार्वजनिक कार्यक्रमांच्या नियोजनात भूमिका पार पाडली आहे.

हेही वाचा

Ashok Chavan :अशोक चव्हाणांचा राजकीय वारस कोण? भारत जोडो यात्रेत चर्चेला उधाण

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील दूध संकलन एका महिन्यात तब्बल 1 लाख लिटरने घटलं; सर्वाधिक घट बीड जिल्ह्यात, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका?
मराठवाड्यातील दूध संकलन एका महिन्यात तब्बल 1 लाख लिटरने घटलं; सर्वाधिक घट बीड जिल्ह्यात, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका?
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Beed News: आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
Bollywood Song Story: माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना
मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, 15 वारकरी जखमी
Embed widget