VIDEO : आजूबाजूला अदानी-अंबानी, मध्यभागी प्रफुल पटेल; अजितदादांच्या शोकसभेत दिग्गजांकडून आदरांजली
Ajit Pawar Shoksabha : विधिमंडळात ज्या पद्धतीने नेते भावूक झाल्याचं दिसून आलं तसंच काहीसं चित्र वरळी डोम येथील अजित पवारांच्या शोकसभा कार्यक्रमात दिसून आलं.

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेचा कार्यक्रम मुंबईतील वरळी डोम येथे पार पडला. त्याप्रसंगी देशातील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते, उद्योगपती उपस्थित होते. या सर्वांनी अजितदादांना आदरांजली वाहिली.
अजितदादांच्या शोकसभेसाठी माजी सरन्यायाधीश भूषण गवई, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनीही उपस्थिती लावली. यादरम्यान, एका बाजूला उद्योगपती मुकेश अंबानी, दुसऱ्या बाजूला उद्योगपती गौतम अदानी आणि मध्यभागी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल बसल्याचं दिसून आलं.
विधिमंडळात ज्या पद्धतीनं अनेक नेते मंडळी भावूक झाल्याचं आपण पाहायला मिळालं, तेच चित्र वरळी डोम या ठिकाणीही दिसून आलं. या शोकसभेत अनेकांनी अजितदादांच्या आठवणी जागवल्या आणि दादांना आदरांजली वाहिली.
























