एक्स्प्लोर

तृतीयपंथीयांना प्रशासनाचं गिफ्ट, दिवाळी झाली गोड; पाहा 'त्या' एका निर्णयामुळे असा होणार फायदा?

Nanded : नांदेड येथील तृतीयपंथीयांनी सामाजिक न्याय विभागाकडे स्वताच्या हक्काची स्मशानभुमी व किन्नर भवन यासाठी जागा मिळावी अशी मागणी मागील काही वर्षांपासून लावून धरली होती.

नांदेड :  एक नवा आदर्श महाराष्ट्रात (Maharashtra) प्रथमच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्माण केला आहे. “आम्हीही माणसं आहोत, आमचेही तसेच रक्त आहे, आम्हीही कुणाचे भाऊ-बहिण आहोत” अशी तृतीयपंथीयांची आर्त हाक ऐकुण नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आता त्यांना त्यांच्या हक्काच्या स्मशानभुमी व तृतीयपंथीय भवनासाठी जागा वितरणाचे आदेश निर्गमीत केले आहे. मागील अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन दिवाळीच्या पर्वावर हा नवा सामाजिक न्यायाची अपूर्व भेट मिळाल्याबद्दल संपूर्ण तृतीयपंथीयांच्या संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले.
 
नांदेड येथील तृतीयपंथीयांनी सामाजिक न्याय विभागाकडे स्वताच्या हक्काची स्मशानभुमी व किन्नर भवन यासाठी जागा मिळावी अशी मागणी मागील काही वर्षांपासून लावून धरली होती. या मागणीचा प्राधान्याने विचार करून त्यांनाही मानवतेच्या प्रवाहात सामावून घेण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाने ही मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, ही मागणी लक्षात आता तृतीयपंथीयांसाठी हक्काच्या स्मशानभुमी व तृतीयपंथीय भवनासाठी जागा वितरणाचे आदेश दिले आहे. 

जमिनीचा आगाऊ ताबा मिळाला...

तृतीयपंथीयांना नांदेड शहरालगत मौ. म्हाळजा परिसरात 1.45 हे. आर. जमीनीबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार नांदेड तहसिलदार यांना निर्देश देऊन या जमिनीचा आगाऊ ताबा सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांना देण्याचे आदेशीत केले आहे. ही जमीन अतिक्रमण मुक्त, निर्विवाद आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांची दिवाळी गोड झाली आहे. 

 तृतीयपंथीयांच्या हक्काच्या जमीन वाटपात सर्वच घटकांच्या संवेदनेचा गौरव

प्रशासकीय पातळीवर अनेक संवेदनशील प्रश्नांना हाताळावे लागते. तृतीयपंथीयांचा विषय हा प्रशासनाच्यादृष्टिने तेवढाचा भावनिक व संवेदनशील असा होऊन जातो. अनेकदा त्यांच्याबाबत घेतलेले चांगले निर्णय काही प्रसंगी बदलावे लागतात. स्मशानभूमीसारखा अत्यंत महत्त्वाचा व तेवढाच गरजेचा असल्याने हा निर्णय व जागा देण्याचे आदेश पारीत करतांना न कळत एक आत्मिक समाधान लाभल्याच्या प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

हक्काच्या स्मशानभूमीत आता माणूस म्हणून विसावता येईल

 जो जन्म वाट्याला आला त्याबद्दल कोणतीही तक्रार न करता आम्ही किन्नर, तृतीयपंथी जीवनातले सुख, दु:ख साजरे करतो. आमच्या हक्काची ही अनेक दिवसांपासूनची आमची मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पूर्ण करून आम्हाला दिवाळीची भेट दिली आहे. आता मृत्यूनंतर कुठे विलीन व्हायचे याची चिंता राहिली नसून हक्काच्या स्मशानभूमीत माणूस म्हणून विसावता येईल या शब्दात तृतीयपंथी किन्नर फरिदा शानूर बकश हिने शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Same Sex Marriage : समलिंगी विवाह संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; कोणालाही लग्न करण्यापासून रोखू शकत नाही, पण...

महत्त्वाच्या बातम्या

Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
Embed widget