महिलेला वाचवताना स्कुटी घसरली अन् त्याचवेळी स्कूल व्हॅन आली, तरुणाचा जागीच मृत्यू; नांदेडमधील विचित्र अपघात सीसीटीव्हीत कैद

Nanded Accident News : अपघाताची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Continues below advertisement

Nanded Accident News : नांदेड (Nanded) शहरात एक विचत्र अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. शहरातील पीरनगर भागात बुधवारी सकाळी विचित्र अपघात झाला. भरधाव वेगाने स्कुटीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्याची स्कूटी घसरली अन् एका महिलेला धडक देत विद्यार्थी रस्त्यावर पडला. तोच समोरून येणाऱ्या स्कूल व्हॅनने या विद्यार्थ्याला चिरडले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Continues below advertisement

अधिक माहिती अशी की, सय्यद अरबाज (रा. आसरानगर) हा विद्यार्थी सकाळी आठ वाजेच्या सुमारास स्कूटीवरून खासगी शिकवणीसाठी जात होता. त्याचवेळी स्कूटीचा टायर घसरल्याने त्याचे स्कूटीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे समोर पायी जाणाऱ्या एका महिलेवर जाऊन तो आदळला अन् रस्त्यावर पडला. तोच विरुद्ध दिशेने स्कूल व्हॅन आली. तर ही स्कूल व्हॅन थेट अरबाजच्या अंगावर गेली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. नागरिकांनी तातडीने सय्यद अरबाज याला खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातात रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेलाही गंभीर दुखापत झाली आहे. 

घटना सीसीटीव्हीत कैद... 

नांदेड शहरात झालेलं हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ज्यात एक महिला रस्त्याच्या मधोमध चालत होती. याचवेळी मागून सय्यद अरबाज आपल्या दुचाकीवरून येत होता. तर समोरून शाळेची व्हॅन येत होती. दरम्यान महिला रस्त्याच्या मधोमध असल्याने अरबाजने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची दुचाकी घसरली. दुचाकी रस्त्यावर घसरल्याने अरबाज खाली पडला आणि त्याचवेळी समोरून आलेली स्कूल व्हॅन अरबाजच्या डोक्यावरून गेली. 

परिसरात हळहळ 

दरम्यान अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. तसेच तत्काळ अरबाजला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर याची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली. मात्र रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. दरम्यान, याची माहिती अरबाजच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. तसेच अरबाजच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी टोह फोडला. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात आक्रोश पाहायला मिळाला. तसेच या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पावसळ्यात काळजी घ्यावी...

सध्या पावसाळा सुरु असून, अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर चिखल, माती आल्याने घसरगुंडी सारखी परिस्थिती होते. अशावेळी दुचाकी चालवतांना काळजी घेण्याची गरज आहे. कारण अनेकदा चिखलामुळे दुचाकी स्लीप होऊन अपघात होण्याची शक्यता असते. तसेच गाडीचा वेग जास्त असल्यास जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात दुचाकी चालवतांना काळजी घेण्याची गरज आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील 89 मंडळापैकी 69 मंडळांत अतिवृष्टी; जुलैमध्ये पावसाचा कहर

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola