Vidarbha Weather Update: विदर्भासह (Vidarbha) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढची पाच दिवस अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. आज सकाळ पासून नागपूरमध्ये (Nagpur) पावसाची रिपरिप सुरु झाली. दुपारला देखील नागपूरसह लगतच्या परिसरातील अनेक भागात अवकाळी पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. सततच्या अस्थिर वातावरणाने बंगालच्या उपसागरातून आद्रतायुक्त वारे मध्य भारतात येत असल्याने सध्या राज्यात मान्सून सदृश्य स्थिती पाहायला मिळत आहे. तसेच पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचे नागपूर वेधशाळेचे उपमहानिदेशक एम. एल शाहू यांनी सांगितले. मात्र या वातावरणाचा मान्सून वर कोणताही परिणाम होणार नसून मान्सूनवर लालिनो प्रभाव असल्याने या वर्षी मान्सून 106 टक्के अपेक्षित असल्याचेही एमएल शाहू यांनी सांगितले.


अवकाळी पावसाने विदर्भालां पुन्हा झोडपलं 


देशातील वातावरणात सतत कमालीचे बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पाऊस (Rain) कोसळत आहे. दरम्यान, काल विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली. तर काल एकट्या वाशिम जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याचे  हवामान विभागानं (IMD) सांगितले होते. असे असताना आज पाहाटे पासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अवकळी पावसाने पुन्हा एंट्री केली आहे. आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि वर्ध्यात अवकळी पाऊस, 30 ते 40 किमी प्रतितास सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट अनुभवायला मिळाला आहे. तर पुढील तीन दिवस विदर्भातील जवळ जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये विरळ ते तुरळक पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात सतत अवकळी पावसाचे आगमन होतं असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी आणि उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


तापमानात मोठी घट


बुलढाण्यात अनेक भागात सकाळपासून विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी पाहायसा मिळत आहे.   पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सोलापूर, बीड , लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा,  बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी  काही भागात विजांच्या कडकडटासह  पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. एकीकडे राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलाडली असताना दुसरीकडे मात्र पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने, ऐन उन्हाळ्यात पावसाळा अनुभवायला मिळतो आहे. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे अवकळी पावसाने मोठे नुकसान केले असताना आता परत अवकाळी पावसाने आणखी संकटाचे ढग गडत होतानाचे चित्र आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Weather: मुंबई, ठाण्याला उष्णतेचा यलो अलर्ट, तर मराठवाडा आणि विदर्भातील भागात पावसाची शक्यता