मुंबई : महाराष्ट्रासह 12 राज्यांत उष्णतेच्या लाटेसह (Heat Wave) पावसाचा (Maharashtra Rain) इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे देशात एकाच वेळी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा (Weather Update) असे तिन्ही ऋतू अनुभवायला मिळत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार विदर्भात आज काही भागात अवकाळी पावसासह इशारा देण्यात आलाय. तर मुंबई, ठाण्यात उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बुलढाण्यात अनेक भागात सकाळपासून विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी पाहायसा मिळत आहे. पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सोलापूर, बीड , लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी काही भागात विजांच्या कडकडटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका
गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. तर आज ठाणे, मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
देशात एकाच वेळी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा
मुंबईतील प्रचंड उकाड्यामुळे मुंबईकर धामाघूम होत आहेत. दुसरी गोव्यात काल जोरदार पावसामुळे दुकानांपर्यंत पाणी शिरलं. तर एप्रिल महिना सुरु होऊनही जम्मू-काश्मीरमध्ये अद्यापही बर्फवृष्टी सुरु आहे. तिसऱ्या दृश्यांमध्ये लाहौल-स्पितीमधील डोंगररांगांवर बर्फ पसरल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा :
Rohini Khadse: भाषण थांबवायला सांगताच रोहिणी खडसे संतापल्या, म्हणाल्या, हे शरद पवारांचं व्यासपीठ....