नागपूरः दृष्टिहीनांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने 'द ब्रेल मॅन ऑफ इंडिया' म्हणून प्रख्यात स्वागत थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रोटरी इशान्य नागपूरच्या पुढाकाराने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात 220 दृष्टिहीनांना प्रशिक्षण दिले. सीताबर्डी येथील माहेश्वरी पंचायतच्या सहकार्याने 30 आणि 31 जुलै रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
Nagpur : मेडिकलमधील दोन डॉक्टरांवर कुत्र्यांचा हल्ला, लचके तोडले
प्रशिक्षणासाठी मुंबईची विशेष टीम
या कार्यशाळेसाठी ज्ञानज्योती अंध विद्यालय नागपूर, ब्लाइंड रिलीफ असोसिएशन नागपूर, राजीव गांधी निवासी अंध विद्यालय काटोल आणि संपूर्ण विदर्भातील 220 हून अधिक मुले आणि प्रौढांनी नोंदणी केली होती. प्रामुख्याने 25 वर्षांपासून अंध प्रशिक्षणासाठी कार्यरत 'द ब्रेल मॅन ऑफ इंडिया' म्हणून प्रसिद्ध स्वागत थोरात यांनी चमूसोबत प्रशिक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यांच्या चमूमध्ये स्वरूपा मांडरे, मृणालिनी देशपांडे आणि प्राजक्ता देशपांडे या मुंबईहून खास प्रशिक्षण देण्यासाठी आल्या होत्या. आतापर्यंत प्रशिक्षकांनी राज्यात पुणे, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणी कार्यशाळा घेतल्या. मात्र 220 प्रशिक्षणार्थी असलेली ही सर्वात मोठी कार्यशाळा असल्याचे प्रमुख अतिथींनी सांगितले.
Nagpur Crime : छेड काढणाऱ्यामुळे किरायाचे घर सोडले, माथेफिरूने केले मुलीच्या वडिलांना केले ठार
या बाबींचे प्रशिक्षण
स्पर्धकांना पांढऱ्या छडीचा शास्त्रीय पद्धतीने वापर कसा करायचा, 2-पॉइंट तंत्र कसे वापरायचे आणि पायऱ्या चढताना छडी पकडण्यासाठी पेन्सिल ग्रिप असे विविध तंत्रे शिकवण्यात आली. इतर ज्ञानेंद्रियांचा वापर करून तृणधान्ये, धान्ये आणि भाजीपाला ओळखणे, वर्दळ असताना रस्ता ओलांडणे. विविध आवाज ओळखणे हा देखील कार्यशाळेचा एक भाग होता. लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे त्यांच्या काळजी घेणाऱ्यांनी कौतुक केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सीसी व्होकेशनल अंकित राठी, अध्यक्ष नरेश बलदवा, सचिव डॉ.आर.टी.एन., डॉ. मनीषा राठी यांनी परिश्रम घेतले.