नागपूरः पूर्वीच्या काळात विविध राजघराण्यात सहज सोन्याच्या महालक्ष्मी केल्या जातात आणि त्यांचे पूजन केल्या जाते. विशेष म्हणजे भोसले (Raje Mudhoji Bhonsle) कुटुंबातील महालक्ष्मी (Mahalaxmi) चांदीच्या असून त्यामागे विशेष कारण ही आहे. प्रजेच्या हिताच्या भावनेतून चांदीच्या (Silver) महालक्ष्मी पुजण्याची परंपरा भोसले कुटुंबातील पुर्वजांनी (By the ancestors of the family) सुरु केली आहे. चांदी ही लखलखते आणि भोसले कुटुंबातील चांदीच्या लखलखणारी महालक्ष्मी संपूर्ण प्रजेवर तसाच प्रकाश पाडतात अशी त्यामागची भावना आहे.


नागपूरचे संस्थानिक आणि राजे असा मान असलेल्या भोसले कुटुंबात महालक्ष्मींचा (गौरींचा) थाट काही वेगळाच असतो. भोसले कुटुंबात गेले 314 वर्षे महालक्ष्मींचे आगमन होत आहे.  चांदी ही लखलखते आणि भोसले कुटुंबातील चांदीच्या लखलखणारी महालक्ष्मी संपूर्ण प्रजेवर तसाच प्रकाश पाडतात अशी त्यामागची भावना आहे. भोसले कुटुंबातील महालक्ष्मींचे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना नैवेद्य सह वेगळा फुलोरा अर्पण केला जातो. भोसले कुटुंबातील फुलोऱ्यात लाडू, घार्गे, गोल पुऱ्या, शंकरपाळे,करंज्या, अनारसे असे घरघुती खाद्य पदार्थां असतात. 


एकदा निमंत्रण दिल्यानंतर पुन्हा कधी निमंत्रण नाही


खास बाब म्हणजे हा फूलोरा चांदी आणि काचेच्या (Glass and Silver Box) विशेष पेटीमध्ये पुजेच्या ठिकाणी महालक्ष्मीच्या वर लटकवून ठेवला जातो. या महालक्ष्मींचा तीसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रसादासाठी कोणालाही एकदा निमंत्रण दिल्यानंतर पुन्हा कधी निमंत्रण दिले जात नाही. त्या व्यक्तिने आजीवन प्रसाद ग्रहण करायला येत राहावे असे अपेक्षित असते. भोसले कुटुंबातील गणपती चे ही खास वैशिष्ट्य असून सात दिवसांच्या या गणपतींना भोसले राजे सातही दिवस स्वतः ची पगडी धारण करतात आणि हे सात दिवस राजे स्वतः पगडी घालत नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Ganeshotsav Special Trains : विदर्भवासियांना थेट कोकण, गोव्यातील गणेशोत्सव बघण्याची संधी, स्पेशल ट्रेन 'फुल्ल'


Chandrapur Corruption : 50 लाखांची लाच, चार महिन्यानंतरही आरोपपत्र नाही; 'त्या' तीन अधिकाऱ्यांवर कोणाचा हात?