नागपूरः गणेशोत्सवासाठी रेल्वे (Indian Railways) प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनला (Festival Special Trains) प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोकणातील (Konkan) गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर ते थेट गोवा (Train for Goa) अशी प्रवासाची सोय असलेल्या 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत, हे विशेष. श्रावण महिना सुरु होताच रेल्वे प्रशासनाच्यावतीने प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या मार्गावर या रेल्वेगाड्या सुरु केल्या होत्या. गणेशोत्सवाची धूम सर्वत्रच असते. मात्र, मुंबई, पुणे, कोकण, गोवा मध्ये गणेशोत्सवाचा माहोलच वेगळा असतो, यासाठी देशभरातून भावित गणरायाच्या दर्शनासाठी कोकण गाठत असतात.
गणेशोत्सवासाठी मंडळी गावाकडे
मुळची कोकणातील मंडळी रोजगाराच्या निमित्ताने कुठेही राहत असली तरी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या गावाकडे धाव घेतात. परिणामी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेत प्रवाशांची मोठी गर्दी होते. ते लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव द्विसाप्ताहीक गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनच्या विविध फेऱ्यांसह नागपूर-मडगाव दरम्यान 20 रेल्वेगाड्या सुरु केल्या होत्या.
स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक
दर शनिवारी (Every Saturday) आणि बुधवारी नागपूर स्थानकावरुन दुपारी 3.05 वाजता निघालेली रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता मडगावला (Madgaon) पोहोचते. तर, दर गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी 7 वाजता मडगाव येथून निघालेली ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री 9.30 वाजता नागपूर (Nagpur Railway Station) स्थानकावर पोहोचत आहे.
या स्थानकांचा समावेश
या रेल्वेमार्गावर असलेल्या वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपूरी, कल्याण, पनवेल, रोहा, मानगाव, वीरखेड, चिपळूण, सावरदा, अरावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम करमलीसह जागोजागी या रेल्वेगाड्या (Railway Stops) थांबत असल्याने त्या-त्या भागातील प्रवाशांचाही या रेल्वेगाड्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या