नागपूरः एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)ने मे महिन्यात मृद व जलसंधारण विभागातील (Department of Soil and Water Conservation) तीन अधिकाऱ्यांना 50 लाख रुपयांची लाच स्विकारताना (accepting a bribe) पकडले होते. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र कारवाईनंतर चार महिने झाल्यानंतरही अद्यापही या प्रकरणात आरोपपत्र (charge sheet) दाखल झालेले नाही.
घटनाक्रम या प्रकारे...
चार मे रोजी एसीबीने (Anti Corruption Bureau) कविजीत पाटील (कार्यकारी अभियंता तथा प्रभारी अधीक्षक अभियंता मृद व जलसंधारण कार्यालय नागपूर), श्रावण शेंडे (उपविभागीय जलसंधारण अधिकारी, चंद्रपूर) आणि रोहित गौतम (विभागीय लेखा अधिकारी मृत व जलसंधारण कार्यालय चंद्रपूर) (Chandrapur) यांना रंगेहात अटक केली होती.
बिले मंजूर करण्यासाठी लाच
एका कंत्राटदाराला मृत व जलसंधारण विभागाकडून 1 कोटी 88 लाख 82 हजार रुपयांचे बिल (Pending Bills) घ्यावयाचे होते. या बिलाला मंजुरी देण्यासाठी कमिशनच्या (Commission for approving bills) रुपाने तिन्ही अधिकाऱ्यांनी 81 लाख 2 हजार रुपयांची लाच मागितली होती. कंत्राटदाराने एसीबीचे अधीक्षक राकेल ओला (Rakesh Ola) यांची भेट घेऊन प्रकरण मांडले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांना 50 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातून निलंबित देखील करण्यात आले होते.
चार महिन्यानंतरही आरोपपत्र नाही
या प्रकरणात चार महिने होत आले असले तरी अद्यापही तीनही अधिकाऱ्यांविरोधात (Three Officers) आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. यावरून विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भात एसीबी सोबत संपर्क साधला असता आरोपपत्राची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले. तीनही अधिकारी सरकारी विभागातील होते व आरोपपत्र दाखल करण्याअगोदर त्यांच्या संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सुरु असून त्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नोटांऐवजी लाचेच्या रकमेत रद्दी
अधिकाऱ्यांना लाच देण्याकरता कंत्राटदारासाठी 81 लाख 2 हजार रुपयांची व्यवस्था करणे कठीण होत होते. एसीबीने ब्रम्हपुरीत जाऊन 50 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या शेंडेला रंगेहात पकडण्याची योजना आखली. लाचेच्या रकमेची त्वरित व्यवस्था करणे शक्य नसल्यामुळे एसीबीने कंत्राटदाराला नोटांची बॅग दिली. त्यात 5 लाख रुपयांचे नोटांचे बंडल आणि 45 लाख रुपयांची रद्दी ठेवली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या