• 1960 मध्ये उभारण्यात आला होता पूल


नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU library) ग्रंथालयासमोरील 1960 मध्ये बांधलेला  पूल पावसामुळे वाहून गेल्याने या पूलाची दुरवस्था झाली. महापालिकेने या पूलाच्या नूतनीकरणासाठी (Renovation of Bridge) निविदा प्रक्रिया सुरू केली असून कार्यादेश देण्यात आल्यानंतर पुलाचे बांधकाम 18 महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. या नवीन पुलाच्या बांधकामासाठी मनपाने 8 कोटींची तरतूद केली आहे. निविदा प्रक्रिया (Tender Process) अद्याप प्राथमिक टप्प्यात असून त्यास अंतिम स्वरुप देत कामाचे कार्यादेश देण्यात येणार आहे. यापूर्वी हा पूल नासुप्रने बांधला होता. त्यानंतर हा पूल मनपाकडे हस्तांतरित करण्यात आला होता. मात्र पुलाच्या देखभालीची मनपाने कोणतीही दखल घेतली नव्हती.


अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत


मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. मोक्षधाम घाटाजवळ बांधण्यात आलेल्या पूलासाठी 18 महिन्याऐवजी 5 वर्षे लागली. तसेच झिरो माईल मेट्रो स्टेशनजवळील (Zero Mile Metro Station DP Road) डीपी रस्ता तयार करण्यासाठी मनपाला 6 वर्षे लागली आहे. याशिवाय महाराजबागेतून जाणाऱ्या रस्त्यावर पूल (Maharajbag Road Bridge) बांधण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या पुलासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या होत्या.


पुलाच्या जीर्ण अवस्थेबाबत दुर्लक्ष


याशिवाय विद्यापीठ ग्रंथालय चौक ते रामदासपेठच्या सेंट्रल बाजार रोडपर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. यापूर्वी अनेक लोकप्रतीनिधींनी मनपा प्रशासनाकडे सिमेंट रस्त्यासह जुना व जीर्ण पूल बांधण्याची मागणी केली होती. निधीअभावी प्रशासनाने केवळ सिमेंट रस्ता तयार करून पूल तसाच ठेवला. धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे यांनाही पुलाच्या जीर्ण अवस्थेबाबत दुर्लक्ष केले होते हे विशेष. मात्र सुदैवाने पुल खचत असताना कुठलाही मोठा अपघात घडला नाही. मात्र ज्या पद्धतीने पूल खचला आहे, जर वर्दळीच्या वेळी हा पूल खचला असता तर मनपाला देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणे अंगाशी आले असते हे निश्चितच.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nagpur School Principal Kidnapped : मैत्रिणीनेच केले होते मुख्याध्यापकाचे अपहरण, 30 लाखांसाठी तब्बल 16 तास ठेवले ओलीस


Nagpur Crime : रेल्वेखाली जीवनयात्रा संपविणारे प्रेमी युगलच, हिंगणा पोलिसांनी 24 तासात पटविली दोघांचीही ओळख