एक्स्प्लोर

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात पवारांचा अवमान नाही, गैरसमज!

पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांना देण्यात आलेली जागा ही पहिल्याच रांगेतील होती, असं प्रेस सेक्रेटरी अशोक मलिक यांनी सांगितलं आहे

नवी दिल्ली / नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाचवी रांग दिल्यामुळे अवमान झाल्याची बातमी समोर आली आणि महाराष्ट्रामध्ये याबाबत नाराजीचा सूर उमटला. मात्र आता पवारांचा अवमान  नसून गैरसमज झाल्याचं स्पष्टीकरण खुद्द राष्ट्रपती भवनातून देण्यात आलं आहे. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांना देण्यात आलेली जागा ही पहिल्याच रांगेतील होती, असं प्रेस सेक्रेटरी अशोक मलिक यांनी सांगितलं आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधीच्या वेळची बैठक व्यवस्थेची दृश्यं आठवली, तर सर्व प्रमुख नेते पहिल्या रांगेत बसले होते. त्या रांगेशेजारी असलेल्या बोर्डवर 'व्ही' हे अक्षर छापण्यात आलं होतं. त्यामुळे व्ही हे अक्षर रोमन लिपीतील पाचव्या रांगेचं निदर्शक नव्हतं. तर व्हीआयपीसाठी वापरण्यात आलेला तो कोड होता. पवारांना देण्यात आलेल्या पासवरही 'व्ही' हे अक्षर छापण्यात आलं होतं. त्याचा अर्थ पाचवी रांग असा लावला गेला. प्रत्यक्षात 'व्ही' म्हणजे 'व्हीआयपी' असल्याचा दावा केला जात आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अवमान? मोदींच्या शपथविधी सोहळ्यात पवारांचा अवमान नाही, गैरसमज! शरद पवारांच्या पासवर छापलेला क्रमांक हा आसन क्रमांक नसून तो तिकिटांचा अनुक्रमांक असल्याचा दावा होत आहे. खरं तर त्या दिवशी फर्स्ट कम फस्ट सर्व अशी बैठक व्यवस्था होती. त्यामुळे पवारांचा अवमान होण्याचा प्रश्नच नव्हता, अशी भूमिका आयोजकांची आहे. केवळ पासवरच्या संदेशाचा अर्थ लावण्यात गल्लत झाली आणि सुरु झालं मानापमान नाट्य. 30 मे रोजी नरेंद्र मोदींसह राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारमन अशा 58 मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. महाराष्ट्रातून शिवसेना खासदार अरविंद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास आठवले यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime : न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा कट उघडकीस
Nagpur Crime : न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा कट उघडकीस
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget