नागपूर: राज्यात मुले चोरणारी टोळी (Child stealing gang) सक्रीय झाली असल्याची अफवा आता नागपुरातही पसरली (Rumors in Nagpur) असल्याचे दिसून येत आहे. त्यातून एकीकडे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असू पोलिसांचीही डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे. सातत्याने सोशल मिडियावर याबाबतचे व्हिडीओ आणि संदेश व्हायरल होत असल्याने पोलिस आयुक्तांनी ट्वीट करत अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर मुले चोरणाऱ्या टोळीबाबत व्हिडीओ (Viral Video) आणि संदेश व्हायरल होताना दिसून येत आहेत. यामध्ये काही ठिकाणी मुले चोरणाऱ्या टोळीला नागरिकांकडून मारहाण केल्याचेही दिसून येत आहे. यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातूनच गेल्या दोन दिवसांपासून नागपुरातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत (Video viral from last two days) अशा तक्रारी पोलिसांना मिळत आहेत. त्यामध्ये जरिपटका, पाचपावली, यशोधरानगर, गिट्टीखदान आणि मानकापूर परिसरात अशाच प्रकारे टोळीद्वारे मुले पळविण्याची अफवा पसरली आहे. पोलिसांनी याबाबत तपास केला असता, ही फक्त अफवा असल्याचे आढळून आले. मात्र, सातत्याने अशा प्रकारच्या अफवांनी शहरात एकच खळबळ माजली असल्याचे चित्र आहे.
पोलिस आयुक्तांकडून व्हिडीओची दखल
शहरात व्हिडीओ आणि संदेशाच्या माध्यमातून मुले चोरणाऱ्या टोळीबाबत अफवा पसरविण्यात येत असल्याने अशी कुठलीही टोळी (police commissioner nagpur message to citizen) नसून त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. याशिवाय मुलांच्या सुरक्षिततेबाबत शहर पोलिसांद्वारे प्राधान्यक्रमाने आवश्यक त्या उपाययोजना नेहमीच केल्या असून नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे
सोशल मिडियाच्या माध्यमातून येणारे कुठलेही व्हिडीओ, ऑडिओ, लिंक आणि संदेश व्हायरल (don't spread fake messages ) करू नका असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असून असे संदेश आल्यास पोलिसांना कळवावे. अशाप्रकारे अफवा पसरविणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंदोरा, मानकापूर, जरीपटका आदी भागातील मुले चोरीला गेल्याची घटना घडली असल्याचे सांगून अनेक नागरिकांकडून व्हिडीओ फॉरवर्ड करण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या