Ram Lalla Ayodhya : अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामाचा (Shree Ram) मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर देशात राममय वातावरण सतत कायम ठेवण्यासाठी आणि राम मंदिराची गाथा समाज माध्यमातून सतत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, भाजपने (BJP) वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला कामी लावले आहे. प्रत्येकी किमान एक लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स असलेल्या 120 हून अधिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची एक खास राम यात्रा रामेश्वरम ते अयोध्या (Rameswaram to Ayodhya) पर्यंत काढण्यात आली आहे.


तब्बल 4 हजार 500 किलोमीटरचा प्रवास करणारी ही यात्रा रामेश्वरम ते आयोध्या पर्यंत ज्या ज्या ठिकाणातून श्रीराम गेले होते अशा सर्व ठिकाणावर जाणार आहे. तिथल्या लोकांशी संवाद साधत लोकांच्या भावना जाणून घेणार आहे. नंतर आपापल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पुढील काही दिवस त्या त्या स्थानाची भावना देशभर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवणार आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएनसर्सची ही खास यात्रा नागपुरात दाखल झाली. यावेळी अजनी चौकावरील हनुमान मंदिरात नागपूरातील भाजप कार्यकर्ते आणि रामभक्तांनी त्याचे जोरदार स्वागत केलं. त्यामुळे शहरात परत एकदा रामभक्तांमध्ये नवंचैतन्य निर्माण झाले. 


देशभरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा सहभाग 


प्रभू श्रीरामांचा भव्यदिव्य अभिषेक सोहळा थाटामाटात पार पडला. देश-विदेशातील दिग्गजांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. तब्बल 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि अयोध्येत रामराज्य परतलं. यावेळी प्रभू श्रीरामाच्या तेजस्वी मूर्तीची अयोध्येतील मंदिरात विधीवत स्थापना करण्यात आली. परमेश्वराचं मनमोहक रूप, आभूषणं आणि वस्त्र पाहून सारं जग थक्क झालं. डोळ्यांचं पारणं फेडणारं श्रीरामाचं रुप पाहून अख्खा देश भारावून गेला. दिवसागणिक अयोध्येत येणाऱ्या देशभरातल्या राम भक्तांचा ओघ कायम आहे. अशातच तरुणाई देखील कोठे कमी पडलेली नाही. देशभरातील 120 हून अधिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची एक खास राम यात्रा रामेश्वरम ते अयोध्यापर्यंत काढण्यात आली आहे.


यात्रेसाठी सोडल्या अनेकांनी नोकऱ्या


या माध्यमातून आता सोशल मीडिया देखील राममंदिरच्या भक्तिरसात नाहून निघणार असल्याचा मानस या यात्रेच्या आयोजकांचा आहे. ठीकठिकाणी या यात्रेचे जोरदार स्वागत केले जात आहे. अशातच नागपुरात ही यात्रा आली असता या यात्रेचे देखील स्वागत करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात ही यात्रा श्रीरामाचा प्राचीन मंदिर असलेल्या रामटेकलाही जाणार आहे. विशेष म्हणजे या खास राम यात्रेत सहभागी होण्यासाठी अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने आपापल्या नोकऱ्या सोडल्या असून 30 दिवसांच्या यात्रेत ते सहभागी झाले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 30 दिवस फक्त रामाचे काम करू अशी या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची भावना आहे. इंदूरचे मलय दीक्षित हे या यात्रेचा नेतृत्व करत असून पंजाबचे आशुतोष गौतम यांचा या यात्रेत प्रामुख्याने सहभाग आहे.


रामेश्वरम ते अयोध्या असा आहे मार्ग 


• रामेश्वरम से तंजावुर (तामिळनाडू)


• तंजावुर से त्रिचुरापल्ली (तामिळनाडू)


• त्रिचुरापल्ली ते मैसूर (कर्नाटक)


• मैसूर ते तुंगभद्रा (हम्पी) (कर्नाटक)


• तुंगभद्रा ते बेलगाम (कर्नाटक)


• बेलगाम ते धाराशिव (महाराष्ट्र)


धाराशिव ते नाशिक (त्र्यंबकेश्वर) (महाराष्ट्र)


नाशिक ते छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)


छत्रपती संभाजीनगर ते नागपूर (महाराष्ट्र)


• नागपूर ते जबलपूर (मध्य प्रदेश)


• जबलपूर ते सतना (मध्य प्रदेश)


• सतना ते चित्रकूट (उत्तर प्रदेश)


• चित्रकूट ते वाराणसी (उत्तर प्रदेश)


• वाराणसी ते  प्रयागराज (उत्तर प्रदेश)


• प्रयागराज ते  नंदीग्राम (उत्तर प्रदेश)


• नंदीग्राम ते अयोध्या (उत्तर प्रदेश)


इतर महत्वाच्या बातम्या