नागपूर:  गेल्या काही काळात दरोडेखोरीच्या घटना कमालिच्या वाढल्या आहेत. झटपट भरपूर पैसे कमावण्याच्या नादात काही मंडळी चोरी, लबाडी, फसवणूक, दरोडेखोरी यांसारखी गुन्हेगारी करतात. नागपूरच्या (Nagpur Crime News)  हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत न्यू ओम नगर येथे दरोड्याची घटना घडली आहे.  धारधार शस्त्र दाखवतं घरातील आठ लाख रुपयांची रोकड पळवून नेली. दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.  दरोडेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा तपास करत आहे. घरफोड्या झाल्याने परिसरतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत न्यू ओम नगर दरोड्याची घटना घडली आहे. काल मध्यरात्री परिसरात राहणारा दुरुगकर कुटुंब झोपलेलं असताना रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान 5 ते 6 आरोपी हत्यार घेऊन घरी शिरले. आरोपीनी घरातले वीज कनेक्शन बंद करून अंधार केले आणि अमित दुरुगकरला धारधार शस्त्राने हल्ला करून जखमी केले. तर इतर सदस्यांच्या गळ्यावर धारदार हत्यार ठेवून त्यांना शांत राहण्यास सांगितले. याच वेळी घराच्या वरच्या मजल्यावर झोपलेल्या अमित दुरुगकर च्या भावाने खाली आरडाओरडा ऐकून लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घरात अज्ञात आरोपी शिरल्याची माहिती दिली.


दरोड्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण


 पोलीस घटनास्थळी पोहोचणार त्या अगोदरच आरोपींनी घरातलं किमती ऐवज आणि आठ लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप एकाही दरोडेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. भरवस्तीत दुरुगकर कुटुंबीयांच्या घरी पडलेल्या या दरोड्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे.


महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर


काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरोडा, मोबाईल फोन, दागिन्यांच्या चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता चोर चोरीसाठी नव्या वस्तूंचा आधार घेताना दिसत आहेत. उदरनिर्वाहासाठी तसंच इतर कारणांसाठी  चोरी करण्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर एकट्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला होता. त्यासोबत पोलिसांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.  


हे ही वाचा :


Amravati Crime News: सर्वेक्षणाच्या नावाखाली तहसीलदारांच्या घरी दरोडा; पोलिसांनी अवघ्या 60 तासांत लावला छडा