एक्स्प्लोर

OBC Reservation : ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, गैरसमज मनात ठेवू नका : देवेंद्र फडणवीस

OBC Reservation : ओबीसी समाजाला राज्य सरकारच्या वतीने आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपूर : "ओबीसी समाजाला (OBC) राज्य सरकारच्या वतीने आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजाच्या मनात आमचं आरक्षण कमी होईल अशी जी भीती आहे, तसा कुठलाही हेतू राज्य सरकारचा नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने कुठलाही गैरसमज मनात ठेवू नये," अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसी समाजाला आरक्षण अबाधित राहण्याबद्दल आश्वासन दिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या आहेत. तर इतर मराठा संघटनाच्याही काही मागण्या आहेत. त्यामुळे सर्वांचा एकत्रित विचार करुन राज्यात यावर राजकारण न करता, समाजाच्या हितासाठी निर्णय होणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून सर्वांनी मिळून प्रश्न सोडवण्याकरता मार्ग काढावे असे आवाहनही त्यांनी केले.

'...तर तोडगा काढणे शक्य'

आरक्षणासारख्या मुद्द्यावर निर्णय करताना राज्य सरकारला कायद्याचा विचार करावा लागतो, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही विचार करावा लागतो. प्रश्न सोडवायचे असेल, तर पुढे ते कायद्याच्या चौकटीत टिकलेही पाहिजे, अन्यथा समाजाला सरकारने आपली फसवणूक केली असे वाटेल असेही फडणवीस म्हणाले. सरकारचा प्रयत्न आणि विश्वास आहे की, सर्वांनी मिळून सकारात्मक विचार केला तर यावर तोडगा काढणे शक्य होईल आणि प्रश्न सुटतील. 

मुख्यमंत्री मनोज जरांगे यांच्याशी बोलले आहेत..

सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलले आहेत. लोकशाहीमध्ये उपोषण करणे, आपले प्रश्न लावून धरणे याला शंभर टक्के मान्यता आहे. लोकशाहीमध्ये ती एक पद्धत आहे. सर्व समाजातील नेत्यांनी कोणतेही वक्तव्य करताना कुठलाही समाज दुखावणार नाही याचा विचार केला पाहिजे, असेही फडणवीस यांनी म्हटले.

ओबीसीमध्ये मराठ्यांना समाविष्ट करु नये : ओबीसी समाज

ओबीसींचं आरक्षण कायम ठेवून मराठा समाज बांधवांना आरक्षण द्या. ओबीसीमध्ये मराठ्यांना समाविष्ट करु नये, मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, अशी मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात येत आहे. तर मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण दिले तर ओबीसी समाज आणि मराठा समाजात संघर्ष होऊ शकतो, अशी चिंता ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे.  

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र ओबीसीतून आरक्षण नको ही भूमिका स्पष्ट आहे. सरसकट प्रमाणपत्र देण्याला सुद्धा सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा विरोध आहे. हे लक्षात ठेवून दोन्ही समाजात तेढ निर्माण होणार नाही. एका समाजाचे काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नाही. यासाठी सरकारने मध्य मार्ग निवडावा. मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा अशी आमची भूमिका आहे, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

हेही वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Naxal News: मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
Devendra Fadnavis on EL NINO effect: आधीच राज्यात दुष्काळ, पुढील वर्षीच्या पावसावरही एल निनोचं सावट, देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
आधीच राज्यात दुष्काळ, पुढील वर्षीच्या पावसावरही एल निनोचं सावट, देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Nagpur Deekshabhoomi Donation: दीक्षाभूमीतील देणगीच्या रकमेत अपहार? नागपूरच्या धर्मदाय आयुक्ताकडे लेखी तक्रार, नेमकं प्रकरण काय?
दीक्षाभूमीतील देणगीच्या रकमेत अपहार? नागपूरच्या धर्मदाय आयुक्ताकडे लेखी तक्रार, नेमकं प्रकरण काय?
Nagpur Crime: नागपूर रेल्वे स्थानकावरून सहा वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण; अवघ्या 24 तासात आरोपीला मिर्झापूरमधून बेड्या ठोकत बालकाची सुखरूप सुटका
नागपूर रेल्वे स्थानकावरून सहा वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण; अवघ्या 24 तासात आरोपीला मिर्झापूरमधून बेड्या ठोकत बालकाची सुखरूप सुटका

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Ashutosh Ranka: आसाममध्ये आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अभिजीत दीपके हिमंता सरकारवर संतापले
आसाममध्ये आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अभिजीत दीपके हिमंता सरकारवर संतापले
Pune Ganesh Visarjan 2026 : पुणे गणेश विसर्जन मिरवणूक 33 तास 33 मिनिटांनंतर संपन्न; गतवर्षाच्या तुलनेत सव्वातास आधीच सांगता, गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चाललं
पुणे गणेश विसर्जन मिरवणूक 33 तास 33 मिनिटांनंतर संपन्न; गतवर्षाच्या तुलनेत सव्वातास आधीच सांगता, गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चाललं
महाराष्ट्रात SIR मधून देशातील सर्वाधिक मतदारांच्या नावावर फुली, तरी सुद्धा ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगविरोधातील विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीत एकमत नाही? कोण काय म्हणाले??
महाराष्ट्रात SIR मधून देशातील सर्वाधिक मतदारांच्या नावावर फुली, तरी सुद्धा ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगविरोधातील विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीत एकमत नाही? कोण काय म्हणाले??
Devendra Fadnavis on EVM :
"ते व्होट चोरी म्हणतात, पण त्यांचा मेंदूच चोरीला गेलाय!"; ईव्हीएम ते निवडणूक आयोग, फडणवीसांचा विरोधकांना टोला, नेमकं काय म्हणाले?
SIR विरोधात देशव्यापी रान उठलं, गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात संतापाचा उद्रेक अन् निवडणूक आयोगाच्या एकाच बैठकीत 9 निर्णय! किती परिणाम होणार?
SIR विरोधात देशव्यापी रान उठलं, गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात संतापाचा उद्रेक अन् निवडणूक आयोगाच्या एकाच बैठकीत 9 निर्णय! किती परिणाम होणार?
Embed widget