एक्स्प्लोर

Awareness : क्षयरुग्णांच्या पोषण अन् उपचाराची घ्या जबाबदारी, योजनेची सुरुवात

नागपूर शहराअंतर्गत उपचाराखालील क्षयरूग्णांना किमान एक वर्षासाठी दत्तक घेऊन रूग्णांना पोषण सहाय्य, व्यावसायिक समर्थन, निदानात्मक सहाय्याद्वारे मदत प्रदान करणे अपेक्षित आहे.

नागपूर : आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय (MOHFW) यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजना अंतर्गत 2025 पर्यंत 'क्षयरोगमुक्त भारत' या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सदर उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दृष्टीने समाजातील विविध स्तरावर काम करणा-या संस्था आणि व्यक्तींसोबत समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय क्षयरोग विभाग, (MOHFW) ने टीबी रूग्णांना पोषण आणि सामाजिक योजना अंतर्गत 'कम्यूनिटी सपोर्ट टू टिबी पेशंट' हा उपक्रम सुरू केलेला आहे. 

त्याचाच एक भाग म्हणून क्षयरूग्णांना उत्तम निदान, उपचाराच्या सुविधा या सोबतच पोषण आहार योजना दिली जाते. तरीदेखील या व्यतिरिक्त सुध्दा ज्यादाचा पौष्टीक आहार (शिधा, फूड बास्केट, अंडी, मिल्क पावडर व प्रोटीन पावडर) व इतर निदान उपचार सुविधा, व्यावसायिक पुनर्वसन याकरीता त्यांना मदत करावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

टीबी रूग्णांचे उपचार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी रूग्णाला अतिरिक्त मदत प्रदान करणे, 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत उद्दिष्टपूर्ती करण्याच्या अनुषंगाने सामाजिक सहभाग वाढविणे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) च्या माध्यमातून उपचाराखालील रूग्णास अतिरिक्त मदत प्रदान करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्टये आहे. या मोहिमेद्वारे क्षयरोग दुरीकरणाच्या प्रयत्नांमध्ये व्यक्ती, सामाजिक संस्थांचा सहभाग वाढणे, टीबीवरील लढ्यासाठी सामाजिक सहाय्य घेणे, क्षयरोगविषयी जनजागृती करणे, क्षयरोगाशी संबंधित समाजातील कलंक, भिती जनजागृतीद्वारे कमी करणे. क्षयरूग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांचा खर्चाचा भार कमी करणे. उपचाराखालील क्षयरूग्णांना पोषण आहार पुरवठा करणे व त्यांच्या उपचाराचे फलित सुधारणे, हे या उपक्रमाद्वारे परिणाम अपेक्षित आहेत.
 
क्षयरूग्णांना एक वर्षासाठी घ्या दत्तक

या उपक्रमाअंतर्गत, गैर सरकारी व सामाजिक संस्था, व्यक्ती, सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही उद्योग संघटना, कॉर्पोरेट्स, औद्योगिक स्वयंसेवी संस्था, व्यापारी असोसिएशन आणि खासदार, आमदार, नगरसेवक व समाजातील सामाजिक कार्यकर्तेद्ध आणि भागीदार यांच्या मदतीद्वारे क्षयरोग मुक्त भारत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने समन्वय साधण्यासाठी शहर क्षयरोग कार्यालयामार्फत यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. या यंत्रणेद्वारे नागपूर शहराअंतर्गत उपचाराखालील क्षयरूग्णांना किमान एक वर्षासाठी दत्तक घेऊन रूग्णांना पोषण सहाय्य, व्यावसायिक समर्थन, निदानात्मक सहाय्याद्वारे मदत प्रदान करणे अपेक्षित आहे.

Startup Nagpur : जिल्ह्यात महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा 17 ते 26 ऑगस्ट दरम्यान

येथे साधा संपर्क

सदर योजनेमध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील क्षयरूग्णांना सहायता म्हणून https://tbcindia.gov.in पोर्टलवर स्वतःचे, संस्थेची नोंदणी करावी किंवा शहर क्षयरोग कार्यालय, सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र, रेसीडेन्सी रोड, कॅनरा बॅकेसमोर, सदर नागपूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन किंवा dtomhngc@rntcp.prg या ई-मेल आयडी द्वारे निक्षय मित्र म्हणून संपर्क साधावा, असेही आवाहन मनपा आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांनी केले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Babanrao Taywade : राज्यातील ओबीसी विद्यार्थी मोठ्या अडचणीत, 72 वसतीगृहांची प्रवेशप्रक्रिया रखडली, बबनराव तायवाडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार
राज्यातील ओबीसी विद्यार्थी मोठ्या अडचणीत, 72 वसतीगृहांची प्रवेशप्रक्रिया रखडली, बबनराव तायवाडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
Nagpur Crime : न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा कट उघडकीस
Nagpur Crime : न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदाराचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी, न्यायव्यवस्थेलाच हादरा देणारा कट उघडकीस
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget