नागपूर : सन 2021 च्या अखेरच्या तीन महिन्यात नागपुरात जी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यात उमेदवारांच्या जागी वेगळ्याच लोकांनी शारीरिक आणि लेखी परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक संपूर्ण टोळीच अशा पद्धतीला उमेदवारांना पास करून देण्यासाठी खोटी लोक परीक्षेत बसवत असल्याचा हा प्रकार आहे. 


नागपूर क्राईम ब्रांचला यात तीन आरोपी पकडण्यात यश आलेलं आहे. ही टोळी औरंगाबादमधील असल्याचे समजते. ज्या उमेदवारांसाठी यांनी हा सगळा कट रचला, ते उमेदवार देखील औरंगाबाद परिसरातलेच आहेत. महत्त्वाचं म्हणजे चक्क या टोळीने उमेदवारांना गाठून त्यांच्याकडून प्रत्येकी बारा ते पंधरा लाख घेतल्याची माहिती समोर आली आहे. 


परीक्षा झाल्यानंतर शारीरिक आणि लेखी परीक्षेत व्हेरिफिकेशन करताना पोलिसांना अर्ज भरलेल्या उमेदवाराचा चेहरा आणि परीक्षार्थींच्या चेहरा यातला फरक लक्षात आला आणि तपास सुरू झाला.  सध्या असे पाच उमेदवार लक्षात आले आहे की ज्यांच्या जागी भलत्याच कोणीतरी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. या टोळीतील इतर सदस्य, तसेच खोटे उमेदवार परीक्षेत बसवणारे आणि पुढे पोलीस होऊ पाहणारे तरुण, यांचा आकडा तपासात वाढू शकतो. तसेच ही टोळी किती काळापासून आणि कुठं-कुठल्या परीक्षांमध्ये सक्रिय होती हे सर्व प्रश्न आहेतच. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majh