नागपूर :  नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद कडून रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. 


सेंट्रल एजन्सीकडून पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालय, रेशीम बागमधील संघाचा डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. पोलीस आयुक्तांनी नागपुरातील कोणत्या ठिकाणांची रेकी करण्यात आली याची माहिती दिली नाही. मात्र, या प्रकरणी युएपीए कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


दरम्यान एबीपी माझा ला मिळालेल्या माहितीप्रमाणे जम्मू-काश्मीरमधील एका तरुणाने जुलै महिन्यात नागपुरात दोन दिवस वास्तव्य करून काही स्थानांची रेकी केल्याची माहिती सेंट्रल एजन्सी कडून नागपूर पोलिसांना मिळाली. तो तरूण नुकतच जम्मू-काश्मीरमध्ये अटक झाल्यानंतर सेंट्रल एजन्सीला  त्याने नागपुरात ही रेकी केल्याची  माहिती मिळाली.  त्यानंतर सर्व माहिती नागपूर पोलिसांना  देण्यात आली.  धक्कादायक म्हणजे पाकिस्तानमधील काहींच्या सांगण्यावरूनच जम्मू-काश्मीरमधील तरुणाने नागपुरात रेकी केल्याची धक्कादायक  माहिती समोर आली आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :