नागपूर : शासनाकडून समाजातील गरीब कुटुंबासाठी दिल्या जाणाऱ्या धान्याच्या काळाबाजाराचा फांडाफोड नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) केला आहे. दिघोरी भागात एका गोदामातून पोलिसांनी छापा टाकून तब्ब्ल 890 गोणी तांदूळ जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याची काळ्या बाजारात विक्री गेल्या 8 महिन्यांपासून सुरु असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघोरी परिसरातील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचा तांदूळ साठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आज पहाटे 4 च्या सुमारास पोलिसांनी गोदामावर छापा टाकला. यावेळी गोदामात 445 क्विंटल तांदूळ साठवल्याचे आढळून आले. पोलिसांनी गोदाम भाड्यावर घेणाऱ्या अमोल लांबाडे आणि कासीम नामक व्यक्तीसह एकाला ताब्यात घेतले.
गोदामात सापडलेला तांदूळ रेशन व्यवस्थेतील असून कोरोना काळात राज्य आणि केंद्र सरकारकडून अंत्योदय आणि प्राधान्य गट श्रेणीतील कुटुंबाना 2 रुपये किलो दराने देण्यात येत होता. हाच तांदूळ वाड्या वस्त्यांमध्ये फिरून लोकांकडून 8 ते 10 रुपये प्रति किलो दराने खरेदी केला जात होता. पुढे हा तांदूळ गोंदिया जिल्ह्यातील एका राईस मिलमून पॉलिश करून घेतला जात असे. यावेळी त्यात काही प्रमाणात चांगल्या तांदळाची मिसळ करून नंतर तो तांदूळ मोठ्या मॉलमध्ये 17 ते 20 रुपये किलो दराने विकण्यासाठी पाठवला जात असे, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.
याबरोबरच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये येणाऱ्या ट्रक्समधील धान्य तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोरले जाते असेही समोर आले आहे. या टोळीने आतापर्यंत हजारो क्विंटल तांदळाची असाच काळाबाजार करत विक्री केली आहे. पोलिसांनी छापा टाकलेल्या गोदामातून महाराष्ट्र शासनाचा शिक्का असलेल्या गोण्यांसह पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारच्या रेशन व्यवस्थेतील रिकाम्या गोण्याही मिळाल्या आहेत.
महत्वाची माहिती
- PM Modi Security : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा भंगप्रकरणी उच्च स्तरीय समिती स्थापन, उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- PM Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेत पोलिसांकडूनच चूक? पोलिसांनी आंदोलकांना मार्गाची माहिती लीक केल्याचा दावा
- Lockdown : भारतात तिसऱ्या लाटेचं तांडव? जानेवारी महिन्यात पीक पॉईंट : शास्त्रज्ञांचा अंदाज