नागपूर: सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली झालेल्या ब्राह्मणी गावातील न्यूड डान्स प्रकरणामुळे नागपुरातच नव्हे तर राज्यभर खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात राजकारण्यांचा सहभाग असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणी ब्राह्मणी गावातील उपसरपंच रितेश आंबोणे यांना अटक केली आहे. 


रितेश आंबोणे यांने न्यूड डान्स आयोजित करण्यासाठी पैसेच दिले होते. घटनेच्या दिवशी त्याने स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून एखाद्या बार किंवा पब मध्ये एन्ट्री करण्यासाठी ज्या पद्धतीने बाऊंसर्सकडून हातावर शिक्के मारून घ्यावे लागतात, त्याच पद्धतीने न्यूड डान्स पाहण्यासाठी आलेल्या आंबट शौकिनांच्या हातावर शिक्के मारले होते अशी माहिती एसआयटीच्या प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी एबीपी माझाला दिली आहे


 जिल्ह्यातील ग्रामीण भागात घडलेल्या न्यूड डान्स प्रकरणी आता राजकारण्यांचा सहभाग समोर येऊ लागला आहे.. नागपूर ग्रामीण पोलिसांनी उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी गावात झालेल्या न्यूड डांस प्रकरणी आता गावातील उपसरपंच रितेश आंबोणे यांना अटक केली आहे.. रितेश आंबोणे यांने फक्त न्यूड डान्स आयोजित करण्यासाठी पैसेच दिले नव्हते... तर घटनेच्या दिवशी उपसरपंच स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून एखाद्या बार किंवा पब मध्ये एन्ट्री करण्यासाठी ज्या पद्धतीने बाऊन्सर्स कडून हातावर शिक्के मारून घ्यावे लागतात... त्याच पद्धतीने न्यूड डांस पाहण्यासाठी आलेल्या आंबट शौकिनांच्या हातावर शिक्के मारले होते अशी माहिती न्यूड डान्स प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी एबीपी माझा ला दिली आहे... 


पोलीस तपासात आणखी काही धक्कादायक माहितीही समोर आली आहे. एसआयटीच्या प्रमुख पूजा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 'अॅलेक्स जुली के हंगामे' या नावाने ग्रामीण भागात पार पडलेल्या डान्स शोचे एकूण तीन भाग होते. पहिला भाग 'हंगामा शो' म्हणून ओळखला जायचा. त्यात हिंदी व भोजपुरी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य असायचे. दुसरा भाग 'नो एन्ट्री' असायचा. त्यात अर्धनग्न अश्लील नृत्य सादर केले जायचे. तर रात्री उशिरा सुरू होणारा तिसरा भाग 'हॉट एन्ट्री' असायचा. त्यातच नग्न नृत्य सादर करत अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जायच्या. विशेष म्हणजे डान्स शोच्या प्रत्येक भागासाठी वेगवेगळे दर आकारले जायचे.


ब्राह्मणी गावात आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांकडून हॉट एन्ट्री प्रकारासाठी शंभर-शंभर रुपये वेगळे आकारले गेल्याची माहिती ही पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी 16 जणांना आरोपी बनवत त्यापैकी 13 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये ब्राह्मणी गावाचा उपसरपंच रितेश आंबोणे याचाही समावेश आहे.


नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी गावात 17 जानेवारी रोजी शंकर पटनंतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली न्यूड डान्सचा प्रकार झाला होता. सोशल मीडियावरून याची प्रसिद्धी करत न्यूड डान्स पाहण्यासाठी आलेल्या आंबट शौकीनाकडून शंभर रुपये तिकीट वसूल केल्याची ही माहिती होती. एबीपी माझा ने सर्व प्रकार उघडकीस आणल्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिस खडबडून जागे झाले होते.


स्वतः पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि त्यानंतर महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटीची निर्मिती करत पोलिसांनी या न्यूड डान्सचे गावातील आयोजक, संबंधित ऑर्केस्ट्राचा संचालक, त्याचे काही नर्तक आणि आयोजनामध्ये सहकार्य करणारे गावातील काही लोक असे एकूण 13 जणांना अटक केली होती.


महत्वाच्या बातम्या: