Nagpur News Update : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी वर्गणी मागणाऱ्या तरुणाला काँग्रेस नेते संजय ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ठाकरे यांच्यासह इतरांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्याअंतर्गत हळदगावमध्ये काल रात्री शैलेश मोटघरे (वय 36) हा तरुण इतर मित्रांसह आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करत होता. गावाजवळून जाणाऱ्या वाहनचालकांना थांबून वर्गणी घेतली जात असताना परिसरातील जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे यांचे पती आणि काँग्रेसचे नेते संजय ठाकरे कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी आले.
वर्गणी गोळा करण्याच्या मुद्द्यावरून त्यांचा शैलेश मोटघरे आणि इतर तरुणांशी वाद झाला. याच वादातून संजय ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शैलेश मोटघरे यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली, असा आरोप मोटघरे यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. याप्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आज अनेक संघटनांनी उमरेड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.
आंदोलनानंतर पोलिसांनी मारहाण, दंगल आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत संजय ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कूही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून संशियत आरोपींचा शोध घेतला जात आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
- Navneet Rana : पोलीस आयुक्तांना निलंबित करणारच, इतर अधिकाऱ्यांनाही लवकरच मिळणार नोटीस : नवनीत राणा
- उपराजधानी हादरली! तरुणींच्या मदतीनं ओडिशामधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांचाही हात
- धक्कादायक! मटणाची भाजी का बनवली नाही? पत्नीला मारहाण, पतीविरोधात गुन्हा
- दीड महिन्यात सात मुलांशी थाटला संसार; किल्ल्यावरून पत्नी पळून गेल्यानंतर सातव्या पतीला कळलं धक्कादायक सत्य