Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी अमरावती पोलिसांवर गंभीर आरोप करत त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती. यावेळी खासदार नवनीत राणांनी मनपा आयुक्त यांच्यावर शाइफेक प्रकरणी आमदार रवी राणांवर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यावेळी रात्री 3 वाजता मोठ्या प्रमाणात पोलीस घरी आले, राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांना भेटायला गेल्या, तेव्हा पोलिसांनी हुज्जत घातली आणि माझा अपमान केला असा नवनीत राणांनी आरोप केला. या तक्रारीची लोकसभा अध्यक्ष यांनी दखल घेऊन संसदीय विशेषाधिकार समितीकडे वर्ग करण्यात आली आणि काल नवीन दुसरा प्रिविलेज देखील दाखल झाला असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली. नवनीत राणा यांनी एबीपी माझाला Exclusive मुलाखतीत दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या
डॉ आरती सिंह यांच्या अडचणीत वाढ, इतर अधिकाऱ्यांनाही लवकरच मिळणार नोटीस
त्यामुळे आता अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली असून आता पुन्हा नव्याने पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड, राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांना लवकरच नोटीस बजावण्यात येईल आणि त्यांना लोकसभेत विशेषाधिकार समिती समोर हजेरी लावावी लागेल आणि या सगळ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होईल आणि ही कारवाई झाल्या शिवाय मी स्वस्त बसणार नाही अशी माहिती खासदार नवनीत राणा यांनी एबीपी माझाला Exclusive मुलाखतीत दिली.
निलंबनाची कारवाई करायला लावणार- नवनीत राणा
14 नोव्हेंबर 2020 दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2020 रोजी हे दोघेही शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री यांच्या मातोश्रीवर जाऊन निवेदन देणार होते पण पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते. यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या आणि त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार. याचीच तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांना 12 जानेवारी 2021 ला केली आणि त्या तक्रारींवर इतर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (ज्यामध्ये भारती पवार आणि हिना गावित) यांचाही समावेश आहे आणि अखेर लोकसभा सचिवालय मधून 24 फेब्रुवारी 2022 ला उपसचिव यांनी 9 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त, अमरावती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग आणि तत्कालीन अमरावती पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांना उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. आता 6 एप्रिल रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे ज्यामध्ये आता पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना देखील हजर राहावं लागत आहे.