Nagpur News : नागपूर जिल्हा परिषदेतील (Nagpur Zhilla Parishad) पेंशन घोटाळ्यानंतर एकाच टेबलवर तीन वर्ष एका विभागात पाच वर्ष कार्यरत असणाऱ्यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) (ZP CEO) यांनी दिले होते. त्यानंतरही अनेक कर्मचारी जैसे थे असून काही विभाग प्रमुखांनी तर अशा कर्मचाऱ्यांची नावेच सीईओंपासून लपवून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मर्जीतील कर्मचाऱ्यांना सोयीसाठी जवळ ठेवत असून बदलीच्या आदेशानंतरही त्यांना सोडण्यास विभाग प्रमुख तयार नसल्याचे दिसते. सीईओंच्या आदेशाला केराची टोपली दाखवत एकप्रकारे नव्याने पेंशन घोटाळ्याला विभाग प्रमुख खतपाणी घातल असल्याची चर्चा आहे. 


जिल्हा परिषदेच्या (Nagpur) पारशिवनी पंचायत (Parseoni) समितीत पावणे दोन कोटींचा पेंशन घोटाळा समोर आला. घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार निलंबित महिला कर्मचारी गेल्या दहा वर्षापासून एकाच विभागात आणि एकच टेबल सांभाळत होती. नियमानुसार तीन वर्षांनी टेबल आणि पाच वर्षांनी विभाग बदलणे आवश्यक आहे. परंतु ते न केल्यानेच हा घोटाळा झाल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांनी तीन वर्ष एकाच टेबल आणि पाच वर्ष एकाच विभागात असलेल्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. काही विभाग प्रमुखांनी त्यांची नावे दिली. परंतु काही मर्जीतील कर्मचाऱ्यांची नावेच दिली नाही. सीईओंनी अशा सर्व कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले. परंतु त्यानंतरही अनेक कर्मचारी जैसे थे आहे. अर्थ, ग्रामीण पाणी पुरवठा, शिक्षण विभागासह ग्रामीण भागातील काही पंचायत समितीत कर्मचारी कार्यरत असल्याची चर्चा आहे. 


सीईओ सौम्या शर्मा यांचे दुर्लक्ष 


सीईओ सौम्या शर्मा (Saumya Sharma CEO Nagpur Zilla Parishad) यांचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचा फायदा विभाग प्रमुख आणि कर्मचारी घेत आहे. कुंभेजकर आणखी काही महिने असते प्रशासनात मोठा कायपाटल झाला असता. परंतु सीईओ शर्मा यांची प्रशासकीय पकड कमी असल्याने अनेकांकडून याचा गैरफायदा घेण्यात येत आहे. त्यामुळे आता त्या यावर काय भूमिका घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.


असा झाला घोटाळा..


नागपूर जिल्हा परिषदेत एका कनिष्ठ महिला लिपिकाने मृतांच्या नावाची पेंशन जवळच्या मंडळींच्या बँक खात्यात वळती केली होती. जिल्हा परिषदेच्या इतिहासामधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा (Biggest Scam In Nagpur ZP) असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात होती. या महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करुन चौकशी समिती गठित करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु असल्याचे सांगण्यात येते. नेवारे असे महिला कर्मचाऱ्याचे नाव होते. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेकडे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेंशनची प्रकरणे हाताळण्याचे काम होते. सेवानिवृत्तीनंतर मृत पावलेले कर्मचारी 'हयात' (जिवंत) असल्याचे दाखवत त्यांची पेंशन आपल्या जवळील व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांच्या खात्यात वळती करत होत्या.


ही बातमी देखील वाचा


शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृतदेह बनले वरकमाईचे साधन; शवगारातून पार्थिव घेण्यासाठी नातेवाईकांना पैसे मोजावे लागतात!