Nagpur Winter Assembly Session Latest News: नागपूरमध्ये (Nagpur News) सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Assembly Session) आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय. दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर (Uddhav Thackeray, Sanjay Raut, Milind Narvekar) नागपुरात येणार आहेत. यामुळं अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरणार आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल नवी मुंबईतील (Navi Mumbai) सभेतून शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis) तसा सूचक इशारा दिला होता. 'AU' प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) घेरल्यानंतर आता ठाकरे गटानेही शिंदे फडणवीस सरकारला उत्तर देण्यासाठी रणनिती आखली आहे. संजय राऊतांनी काल बोलताना नागपुरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिल्यामुळे आज नागपुरात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात
आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर नागपुरात येणार आहेत, गेल्या आठवड्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारने आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता.
उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॉम्ब फोडणार : संजय राऊत
संजय राऊत काल बोलताना म्हणाले होते की, नागपूरमध्ये उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॅाम्ब फोडणार आहोत. आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, आमची सेना लेचापेचा, पळपुट्यांची नाही. धमक्या द्या , तडीपारी करा तरीही आमची सेना बुलंद आहे. फेब्रुवारीपर्यंत काहीही करून घ्या. नंतर तुम्ही नसणार. अली बाबा चाळीस चोर फेब्रुवारीनंतर नसणार. आम्ही बलिदान दिले. रक्त सांडले.तुम्ही काय केले टेंडर काढली, भूखंड खाल्ले, असा आरोप त्यांनी केला होता. 40 आमदार गेले असले तरी आता 140 आमदार निवडून आणून आपला मुख्यमंत्री बनवायचा आहे. ज्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना सोडायचे नाही.अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरून तुमची झोप उडवणार. तुमचे शंभर बाप आले तरी तुम्हाला सोडणार नाही. ज्या कोठडीत मी होतो. त्यात तुम्हाला टाकणार. तुमच्या फायली तयार आहेत. आमचे सरकार आल्यावर तुम्हाला दया मया नाही, तुम्ही मागून खंजीर खुपसला, आम्ही पुढून खुपसू, असा इशाराही संजय राऊतांनी दिला होता.
ही बातमी देखील वाचा