Nagpur News : उपराजधानी नागपूर (Nagpur News) शहरातील इतवारी रेल्वेस्थानकावर कळमना दिशेकडे बनविण्यात येत असलेल्या सब-वे करिता बॉक्स (एलएचएस) पुशिंगचे कार्य प्रगतीपथावर आहे. त्यामुळे काही काळ रेल्वे ब्लॉक करण्यात येत आहे. परिणामी त्याचा थेट फटका हा रेल्वे वाहतुकीवर होणार असून मे महिन्यात वेगवेगळ्या वेळेस रेल्वे गाड्या प्रभावित होणार आहेत. तूर्त दक्षिण, पूर्व, मध्य रेल्वेने सुमारे डझनभर गाड्या नियोजित तारखांना रद्द केल्याची माहितीही पुढे आली आहे. ऐन उन्हाळी सुट्या आणि लग्न समारंभाच्या हंगामात प्रवाशांची गर्दी वाढत असताना, करण्यात आलेला हा ब्लॉक प्रवाशांसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे.
या रेल्वेगाड्यांना फटका
इतवारी रेल्वेस्थानकावर कळमनाच्या दिशेकडे बनविण्यात येत असलेल्या सब-वेकरिता एलएचएस पुशिंगचे काम 8 मे पासून 30 मे पर्यंत चालणार आहे. त्यामुळे 08711/08712 डोंगरगड-गोंदिया- डोंगरगड मेमू, 08713, 08716 गोंदिया-सुभाष चंद्र बोस (इतवारी)- गोंदिया, 08751/08756 इतवारी-रामटेक-इतवारी मेमू पॅसेंजर स्पेशल 08754/08755 इतवारी रामटेक-इतवारी मेमू 08714/08715 इतवारी-बालाघाट- इतवारी मेमू 08281 इतवारी-तिरोडी पॅसेंजर,08284/08283 तिरोडी- तुमसर-तिरोडी पॅसेंजर 8 ते 11 मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. याच कालावधीत 08282 तिरोडी- इतवारी पॅसेंजर, 18109/18110 टाटानगर-इतवारी-टाटानगर एक्स्प्रेस, 11201/11202 नागपूर- शहाडोल- नागपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेल्या गाड्या
इतवारी-रिवा एक्स्प्रेस 8, 10, 11,13, 15, 17, 20, 22, 24, 25, 27, 29 आणि 31 मे रोजी रद्द राहील
रिवा-इतवारी एक्स्प्रेस 7, 9, 10, 12, 14, 16, 17, 19, 21, 23, 24, 26, 28 आणि 30 मे रोजी रद्द राहील
11201 नागपूर-शहडोल एक्स्प्रेस 19 ते 30 मे पर्यंत तर, 11202 शहडोल-नागपूर एक्स्प्रेस ही गाडी 20 ते 31 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे
हमसफर एक्स्प्रेसमधून मद्यसाठा जप्त
सध्या सर्वत्र उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईचा काळ आहे. त्यामुळे रेल्वेला प्रचंड गर्दी असल्याचे चित्र आहे. याच संधीचा फायदा घेत रेल्वेतून अमली पदार्थांच्या तस्करीला उत आला आहे. अशीच एका छुप्या कारवाईचा छडा रेल्वे पोलिसांचा प्रिन्स नामक श्वानाने लावला आहे. तिरूपती एक्स्प्रेसमधून होत असलेल्या मद्य तस्करीचा छडा लावून प्रिन्सने मोठा मद्यसाठा पकडून दिलाय. विशेष म्हणजे, या कारवाईला बरेच तास होऊनही रेल्वे सुरक्षा दलाकडून मद्य तस्करांची नावे उघड करण्याची तसदी घेतली गेली नाही.
तिरूपती हमसफर एक्स्प्रेस नागपूर स्थानकावर आली असताना आरपीएफचे जवान प्रिन्सनामक श्वानासह या गाडीची तपासणी करू लागले. कोच नंबर बी-4 मध्ये 15, 45 आणि 52 नंबरच्या सीटखाली तीन संशयास्पद पिशव्या आढळल्या. प्रिन्सच्या संकेतानंतर पिशव्या तपासल्या असता त्यात इंग्लिश मद्याच्या वेगवेगळ्या 38 बाटल्या आढळल्या. या मद्याची किंमत 88 हजार 500 रुपये आहे. आरपीएफने हा मद्यसाठा जप्त करून पुढील कारवाईसाठी तो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपुर्द केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या