Vidarbha Unseasonal Rain : हवामान विभागाने (IMD) देलेल्या इशाऱ्यानुसार नागपूरसह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना अवकळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. नागपुरात (Nagpur) गुरुवारी सकाळी काही तास कोसळलेल्या अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने एकच दाणादान उडवली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत नागपुरात 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर काल गुरुवारी सकाळपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 50.2 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात गेल्या 58 वर्षातला हा एका दिवसातील सर्वाधिक पाऊस गणला गेला आहे. अचानक कोसळलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांसह शेतकरी आणि बाजार समितीला बसला आहे.


लाखोंचे धान्य पावसात भिजलं 


अवघे काही तास कोसळलेल्या या अवकाळी पावसाने नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांनी नुकसान केले आहे. यात खरेदी-विक्रीसाठी आणलेला माल आणि धान्य भिजले आहे. विशेष करून शेतकऱ्यांच्या तुरी, गहू, हरभरा या धान्यांच्या मालाला या अवकाळी पावसाचा फटका बसलाय. कळमना धान्य बाजारात शेडच्या बाहेर ठेवलेला लाखोंचा शेतमालही यात भिजलाय. सकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने विक्रीसाठी आलेला माल झाकण्याचा वेळही शेतकरी आणि व्यापऱ्यांना मिळाला नाही. दुसरीकडे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अपुऱ्या सुविधांमुळे शेतकऱ्यांना नेहमीच असा फटका बसतो, अशी ओरड शेतकरी, व्यापऱ्यांनी बोलून दाखवली आहे.  


हवामान विभागाकडून अलर्ट जारी


हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाने  दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी काल दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. तर या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय. अशातच पुढील 48 तासात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना नागपूर प्रदेशीक हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर आज 10  मे ते 14 मे दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, विजांच्या कडकडाटास 30-40 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 


अवकाळीनं हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास


गेल्या तीन दिवसात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अनेकांच्या शेतातील भातपीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांनी धान मळणीसाठी धान कळपा शेतात कापून ठेवलेल्या असताना त्या अवकाळी पावसात सापडल्यानं आता पाण्याखाली आल्या आहेत. यामुळं धानाची नासाडी होण्याची भीती आहे. तर, काही ठिकाणी कापणीला आलेले भात पीक जोरदार वारा आणि पावसात सापडल्यानं जमीनदोस्त झालेलं आहे. अगदी काही दिवसात निघालेल्या भात पिकाची विक्री करून स्वतःवर असलेलं कर्ज फेडण्याचं स्वप्न बघत असतानाच आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेराल्यानं भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुरता हतबल झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या