नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. युवा सेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन पदाधिकाऱ्यांसह इतर पाच जणांवर देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच दोघे जण फरार झाले आहेत. 


नागपूरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतम कापसे आणि शहराध्यक्ष शशिधर तिवारी यांच्या विरोात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला हे. एका रुणानं या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतम कापसे आणि नागपूर शहराध्यक्ष शशिधर तिवारी यांच्या विरोधात वाठोडा पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आर प्रमाणे प्रीतम कापसे आणि शशीधर तिवारी या दोघांनी त्यांच्या इतर पाच-सहा सहकाऱ्यांच्या मदतीने वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत आदिवासी नगर मध्ये राहणाऱ्या सौरभ रणनवरे या तरुणाचे जुन्या वैमनस्याच्या कारणातून अपहरण केले आणि नंतर त्याला नागपूरच्या बाहेर निर्जन स्थानी नेऊन जबर मारहाण केली आणि बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याचा प्रयत्नही केला.  


सौरभ रणनवरे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर युवा सेनेच्या दोन्ही पदाधिकारी आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असली.. तरी प्रीतम कापसे आणि शशीधर तिवारी दोघेही फरार आहेत. पोलीस या या दोघांसह इतर आरोपींना कधी अटक करतात ते पाहावं लागेल.


इतर बातम्या : 



सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट