Maharashtra Rain News : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार उद्या (26 ऑगस्ट) राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. उद्या कोकणात (Konkan) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी,
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उद्या मुंबई आणि पालघरमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज
उत्तर महाराष्ट्रात देखील उद्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. नाशिकमध्ये उद्या तुरळक भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नंदुरबारमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, शहरी भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस ( Heavy Rain) कोसळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्या तरीदेखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, सध्या उजनी धरणात (Ujani Dam) देखील मोठ्या प्रमाणातक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत 60 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वीर धरणातून 63 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं भीमा व नीरा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, वीर धरणाचे दरवाजे आणखी वर उचलले आहेत. वीर धरणातून 63 हजार 273 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस ( Heavy Rain) पडत आहे. यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
महत्वाच्या बातम्या: