Nagpur Crime News : मॅट्रोमोनी साइटवरून झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीवर अत्याचार (Nagpur Crime) करण्यात आला. त्यानंतर संशयित आरोपीने तिच्याकडून महागड्या मोबाईल फोनसह अडीच लाख रुपये उकळले. मात्र लग्नाची विचारणा केली असता त्याने कायम टाळाटाळ केली. जेव्हा पीडित तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता, या संशयित आरोपीने (Nagpur Crime News)लग्नासाठी नकार दिला. आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाचे लग्न झाले होते. ही बाब त्याने तिच्यापासून लपवून ठेवली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस स्टेशन (Nagpur Police) गाठत तक्रार दिल्याने हे प्रकरण समोर आले. राहुल उत्तमराव डाखोरे (33, मोंढा, हिंगणा नाका) असे फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
महागड्या मोबाईलसह उकळली लाखोंची रक्कम
नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीची राहुल सोबत एका विवाह संकेतस्थळावरून ओळख झाली. दरम्यान त्यांच्यात बोलणे सुरू झाले आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान त्यांच्यात ओळख वाढून अधिक जवळीक निर्माण झाली. त्यानंतर राहुल तिला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. पुढे आपल्यात लग्न होणार असल्याने तरुणीने देखील त्याला नकार दिला नाही. त्यानंतर राहुलने एका महागड्या कंपनीचा मोबाइल आणि इतर वस्तू घेण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र तरुणीने पैसे नसल्याचे सांगितल्यास राहुलने तिला बळजबरी केली. त्यानंतर तरुणीने राहुलला वेगवेगळ्या वेळी अडीच लाख रुपये दिले. मात्र तरुणीने राहुलला लग्नाची विचारणा केली असता तो कायम उडवा उडावीचे उत्तर देत होता. आश्चर्याची बाब म्हणजे राहुलेचे लग्न झाले होते. ही बाब त्याने तिच्यापासून लपवून ठेवली होती. मात्र कालांतराने तरुणीने राहुलकडे लग्नाबाबत हट्ट केल्याने त्याने तरुणीला लग्नासाठी नकार दिला आणि पैसे देखील परत देणार नसल्याचे सांगितले. पीडित तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने तत्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून राहुल विरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी राहुलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दरम्यान, पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. श्याम ऊर्फ बिट्ठ प्रशांत बेलखोडे (24, जय जलाराम नगर, खरबी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याची नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 15 वर्षीय विद्यार्थिनीशी ओळख झाली. त्याने तिला मैत्रीच्या जाळ्यात ओढले आणि खोटी आश्वासने देत तिच्याशी जवळीक साधली. दरम्यान 19 जानेवारीला त्याने पीडित तरुणीला पाणीपुरी खाण्यासाठी हसनबाग येथे बोलविले. त्यानंतर त्याने तिला मोटारसायकलवर बसवून कूलर कंपनीजवळ नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या पीडित मुलीने दिलेला तक्रारी वरून पोलिसांनी संशयित आरोपी श्यामविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
इतर महत्वाच्या बातम्या