नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा (Hingana) तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वेणा नदी किनारी तब्बल 800 आधारकार्ड (Aadhar Card) आढळून आले आहेत. पोलिसांनी हे आधारकार्ड जप्त केले असून या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरातील वेणा नदीत शिवारात 800 आधार कार्ड अज्ञाताने फेकले होते. दोन दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांना नदीपात्रात अनेक आधारकार्ड दिसून आली. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
800 आधारकार्ड पोलिसांनी केले जप्त
त्यानंतर पोलिसांनी परिसरातून फेकलेले सुमारे 800 आधारकार्ड जप्त केले आहे. प्राथमिक तपासानुसार हे आधारकार्ड वानाडोंगरी पोस्ट ऑफिसमधून वितरित न केलेले आधारकार्ड असल्याची शक्यता आहे. वानाडोंगरी येथील पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या वर्षभरापासून वितरित न केलेले आधारकार्ड मोठ्या प्रमाणात पडून होते. तेच आधार कार्ड कुठल्यातरी कर्मचाऱ्याने वितरित न करता नदीपात्रात फेकून दिले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी पोस्ट ऑफिसमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोलीस चौकशी करत आहेत. या चौकशी नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महात्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या