Anil Deshmukh on Devendra Fadnavis : मनसुख हिरेनची हत्या (Mansukh Hiren murder case) झाल्यावर त्याच्या कुटुंबातील लोकांना मृतदेहाची ओळख पटल्यावर शासनानं जाहीर केल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले. मृतदेहाची ओळख पटल्याशिवाय शासनाला त्या मृतदेहासंदर्भात माहिती देता येत नाही असेही देशमुख म्हणाले. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis), परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे तिघेही एकच आहेत. फडणवीसांच्या जवळचे असणारे परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना या हत्येसंदर्भात माहिती होती, त्यांनीच हत्या घडवून आणली असा आरोप देखील देशमुखांनी केला आहे. हे दोघे काय करतात ते फडणवीसांना माहित होतं असेही देशमुख म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी मनसुख हिरेनच्या हत्येसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर देशमुख बोलत होते.
फडणवीसांचा गृहमंत्रीपदाचा किती अभ्यास हे दिसतंय
देवेंद्र फडणवीस हे स्वत: गृहमंत्री आहेत. त्यांचा गृहमंत्रीपदाचा किती अभ्यास आहे हे दिसतयंत. मनसुख हिरेनची हत्या झाल्यावर त्याचा मृतदेह सकाळी सापडला. जोपर्यंत मृतदेहाची घरच्यांकडून ओळख पटत नाही तोपर्यंत, तोपर्यंत त्याबाबत माहिती देता येत नाही. फडणवीसांना एवढंही ज्ञान नाही याचं मला आश्चर्य वाटत असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. मनसुख हिरेनच्या घरच्यांना मृतदेहाची ओळख पटल्यावर आम्ही जाहीर केल्याचे देशमुख म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी मनसुख हिरेनच्या हत्येसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
फडणवीसांचा अनिल देशमुखांना नेमका सवाल काय?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना माझा केवळ एकच प्रश्न आहेत. मला माहिती आहे की ते याचे उत्तर देणार नाहीत आणि तशी अपेक्षा देखील माझी नाही. मात्र त्यांना माझा केवळ एक सवाल आहे की, मनसुख हिरेनची हत्या (Mansukh Hiren Murder Case) होणार आहे, हे अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) माहिती होतं की नाही? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. असा थेट सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनिल देशमुख यांना आव्हान दिले आहे. मनसुख हिरेनच्या हत्येच्या प्रकरणाबाबत सदनामध्ये मी का शंका घेतली? त्यावेळी मनसुख हिरेन यांना गायब करण्यात आलं आणि त्यांची हत्या होऊ शकते, अशी भीती मी व्यक्त केली होती. त्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत उत्तर द्यावं, ते यावर भाष्य करणार नाहीत. मात्र यावरचे उत्तर नक्कीच कधी ना कधी बाहेर येईल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या:
Devendra Fadnavis: मनसुख हिरेनची हत्या होईल हे अनिल देशमुखांना माहिती होतं की नव्हतं? देवेंद्र फडणवीस यांचा थेट सवाल