एक्स्प्लोर
Advertisement
परस्पर संमतीने डॉक्टर-रुग्णाचे लैंगिक संबंध आले, तरी ते अनैतिक!
डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध हे पालक व पाल्य यांच्यासारखे असणे आवश्यक आहे, असं मेडिकल कौन्सिलने नवीन नियमावलीत स्पष्ट केलं आहे.
नागपूर : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात परस्पर संमतीने लैंगिक संबंध आले, तरी अनैतिकच असतील. वैद्यकीय क्षेत्रात भविष्यात 'मी टू' सारख्या घटनांवर आळा बसावा, यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या एथिकल कमिटीने नवे मार्गदर्शक नियम तयार केले आहेत.
डॉक्टर आणि रुग्ण यांच्या संबंधातील पावित्र्य कायम राहावे, वैद्यकीय क्षेत्रात 'मी टू' सारख्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी हे नियम वैद्यकीय क्षेत्रात लागू केले जाणार आहेत. या नियमानुसार डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील लैंगिक संबंध हे अनैतिक असतील. ते परस्पर संमतीने झालेले असले तरीही ते मान्य करता येणार नाहीत.
डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध हे पालक व पाल्य यांच्यासारखे असणे आवश्यक आहे, असेही या नवीन नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
स्पेशल रिपोर्ट | नागपूर | नागपुरात 'देसी मीटू'मध्ये तरुणींच्या व्यथांना वाचा
अशा प्रकारची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वं केवळ वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठीच आवश्यक नाही, तर इतर क्षेत्रातील लोकांसाठीही जरुरी असल्याचं मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या एथिकल समितीचे सदस्य डॉ अनिल लद्धड यांनी व्यक्त केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement