Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: मराठा आरक्षणावर आज दोन्ही सभागृहात चर्चा होणार, विधानभवनावर दहा मोर्चे धडकणार, प्रत्येक अपडेट जाणून घ्या

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates: मराठा आरक्षणावर मंगळवारी सुरु झालेली चर्चा आजही दिवसभर सुरु राहिल. विधानसभेत सकाळी 11 पासून चर्चेला सुरुवात होईल.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 13 Dec 2023 11:24 AM
Maharashtra Assembly Winter Session LIVE: 55 हजार 520 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates: विधीमंडळात दोन दिवसांच्या चर्चेनंतर 55 हजार 520 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर, पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधानिर्मिती, विकासाची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन.

Hiwali Adhiveshan: विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, लेखापरीक्षण अहवालातील निष्कर्ष

Pandharpur Ladoo: पंढरीला येणारे वारकरी मोठ्या भक्तिभावाने विठूराया लाडूचा प्रसाद घेऊन जातात. प्रसादाचा हा लाडू निकृष्ट दर्जाचा असून तो तयार होणाऱ्या कारखान्यात स्वच्छतेचा अभाव आहे, असा निष्कर्ष लेखापरीक्षण अहवालात नोंदवण्यात आला आहे. तसंच या लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो, असा इशारा देण्यात आलाय. नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा वर्ष 2020-21 चा लेखापरीक्षण अहवाल आणि त्यावरील अनुपालन अहवाल सादर झाला. त्यात प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूसंदर्भात गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

Hiwali Adhiveshan 2023 LIVE Updates: हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळावर धडकणार दहा मोर्चे

Hiwali Adhiveshan 2023 LIVE Updates: हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळावर धडकणार दहा मोर्चे, संगणक परिचालक आणि लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा लक्षणीय ठरण्याची शक्यता.


आज एकूण दहा मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने संगणक परिचालकांचा मोर्चा तसंच लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा लक्षणीय ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय शाहीर आणि कलावंतांचा मोर्चा तसेच कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा मोर्चाही महत्त्वाचा ठरणार आहे. 

Winter Session 2023 LIVE: माजी मंत्री नवाब मलिक विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत

Nawab Malik, Winter Session 2023 LIVE: माजी मंत्री नवाब मलिक विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत. प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी दिला आराम करण्याचा सल्ला.  मलिक पुढील आठवड्यात कामकाजात सहभागी होण्याची शक्यता.

Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल 20 डिसेंबरपर्यंत? राहुल नार्वेकरांनी दिली महत्त्वाची माहिती

Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा 20 तारखेपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न, राहुल नार्वेकरांची माहिती.


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, "आपल्या सर्वांना माहीत आहे की विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. सातत्यानं सकाळ आणि संध्याकाळी जवळपास दररोज सात तास सुनावणी घेऊन साक्ष पूर्ण झालेली आहे. आता पुढील कार्यवाही पूर्ण करून हे प्रकरण निकालासाठी क्लोज करायचे, असं मी प्रस्तावित केलं आहे. त्या अनुशंगाने सर्वांच्या सहकार्याने 20 तारखेपर्यंत हे कार्य पूर्ण करायचा माझा प्रयत्न आहे."

Winter Session 2023 LIVE: केंद्र सरकारकडून वाढवण बंदराच्या उभारणीच्या हालचाली सुरू, मात्र याविरोधात स्थानिक आक्रमक, आज विधानसभेवर मोर्चा धडकणार
Maharashtra Winter Session 2023 LIVE: गेल्या 40 वर्षांत कोणी मराठा आरक्षणाला खोडा घातला? मुंबईत झळकले बॅनर्स, पोलिसांनी हटवले

Maharashtra Winter Session 2023 LIVE:  मराठा आरक्षणच्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात चर्चा होत असताना मुंबईत मराठा आरक्षणच्या संदर्भात गेल्या 40 वर्षांत कोणी मराठा आरक्षणाला खोडा घातला? असा सवाल विचारणारे बॅनर पहाटे लावण्यात आले आणि काही वेळात पोलिसांकडून काढण्यातही आले.


चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अज्ञात व्यक्तींकडून हे बॅनर लावण्यात आले होते.या बॅनर वरून मराठा समाजाला आरक्षणाला गेली 40 वर्ष सत्तेत असणारे यांनी आरक्षण दिल नाही आणि आत्ता ते आरक्षणच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहे असा थेट रोख या बॅनर वरून शरद पवार यांच्याकडे असल्याचे दिसून येत आहे.या वरील मजकूर पाहता तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांनी तात्काळ हे बॅनर हटवले.

विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, लेखापरीक्षण अहवालातील निष्कर्ष

Pandharpur Prasad: विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, लेखापरीक्षण अहवालातील निष्कर्ष, मात्र लाडू प्रसादाबाबत सादर केलेला अहवाल 2021 ते 22 दरम्यानचा. तेव्हा कंत्राटदार लाडू बनवत होता. मात्र सध्या लाडू मंदिर समितीकडून बनविला जातोय, मंदिर समितीचं स्पष्टीकरण. 

Assembly Winter Session 2023 LIVE: मराठा आरक्षण मिळावं पण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू : अंबादास दानवे

Assembly Winter Session 2023 LIVE: मराठा आरक्षण मिळावं पण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू नये हीच आमची पक्षाची भूमिका आहे, असं ठाकरे गटाचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. 


मी पाठवलेल्या पत्राला अजूनही उत्तर आलेले नाही, शिवाय नवाब मलिक यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्राचा विषय जर त्यांच्यासाठी संपला असेल तर तो संपला की सुरू झाला हे कळेल, त्याला फक्त अधिवेशनच लागेल असं नाही, असंही अंबादास दानवे म्हणाले आहेत. तसेच, जर तोडगा जुन्या पेन्शन संदर्भात सरकारकडून निघत असेल तर त्यांनी तातडीने काढावा, असा सल्लाही अंबादास दानवेंनी दिला आहे. 

Hiwali Adhiveshan LIVE: संगणक परिचालकांसह विधानभवनावर आज दहा मोर्चे धडकणार

Hiwali Adhiveshan 2023 LIVE Updates: आज एकूण दहा मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने संगणक परिचालकांचा मोर्चा तसंच लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा लक्षणीय ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय शाहीर आणि कलावंतांचा मोर्चा तसेच कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा मोर्चाही महत्त्वाचा ठरणार आहे. 

Hiwali Adhiveshan LIVE: बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता

Maharashtra Vidhimandal Hiwali Adhiveshan LIVE: बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. बारसूमधील माती परीक्षणावेळी झालेल्या आंदोलनादरम्यान 300 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आज सर्व आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून पत्र देणार आहेत.

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: मराठा आरक्षणावर आज दोन्ही सभागृहात चर्चा होणार

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: मराठा आरक्षणावर मंगळवारी सुरु झालेली चर्चा आजही दिवसभर सुरु राहिल. विधानसभेत सकाळी 11 पासून चर्चेला सुरुवात होईल. तर विधानपरिषदेत आज दुपारी साडेतीन वाजता चर्चा होणार आहे. तर दुसरीकडे आज एकूण दहा मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने संगणक परिचालकांचा मोर्चा तसंच लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा लक्षणीय ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय शाहीर आणि कलावंतांचा मोर्चा तसेच कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा मोर्चाही महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. बारसूमधील माती परीक्षणावेळी झालेल्या आंदोलनादरम्यान 300 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आज सर्व आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून पत्र देणार आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates: मराठा आरक्षणावर मंगळवारी सुरु झालेली चर्चा आजही दिवसभर सुरु राहिल. विधानसभेत सकाळी 11 पासून चर्चेला सुरुवात होईल. तर विधानपरिषदेत आज दुपारी साडेतीन वाजता चर्चा होणार आहे. तर दुसरीकडे आज एकूण दहा मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने संगणक परिचालकांचा मोर्चा तसंच लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा लक्षणीय ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय शाहीर आणि कलावंतांचा मोर्चा तसेच कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा मोर्चाही महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. बारसूमधील माती परीक्षणावेळी झालेल्या आंदोलनादरम्यान 300 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आज सर्व आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून पत्र देणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.