नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. आता महाविकास आघाडीत रामटेक विधानसभा मतदारसंघावरून (Ramtek Assembly Constituency) बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. 


नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी ही जागा जाहीर करण्यात आली आहे. काल शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत रामटेक मधून विशाल बरबटे यांचा उमेदवार म्हणून नाव जाहीर झालं असलं, तरी काँग्रेसने अद्यापही रामटेक संदर्भातली आपली भूमिका मवाळ केलेली नाही, काँग्रेसने रामटेक संदर्भातले प्रयत्न अजूनही सोडलेले नाही. 


राजकारणात जी गोष्ट आज असते ती दुसऱ्या दिवशी नसते


काँग्रेसला अपेक्षा आहे की, यासंदर्भात आज पुन्हा चर्चा होऊन रामटेकबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाचा पुनर्विचार होऊ शकतो. "राजकारणात जी गोष्ट आज असते ती दुसऱ्या दिवशी नसते" असं काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना वाटतंय आणि त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या जागा वाटपात रामटेकची जागा शिवसेना ठाकरे गटाऐवजी काँग्रेससाठी सोडली जाईल, अशी अपेक्षा राजेंद्र राजेंद्र मुळक यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आहे.  


महाविकास आघाडीत हाय व्होल्टेज ड्रामा


राजेंद्र मुळक हे राज्याचे माजी ऊर्जा व वित्त राज्यमंत्री आहेत. ते पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू असून त्यांची इच्छा असलेल्या रामटेक मतदारसंघात अखेरच्या क्षणी चमत्कार होईल अशी अपेक्षा काँग्रेसच्या गोटात कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल 85-85-85 असा सूत्र सांगत महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला असला तरी रामटेकसारख्या अनेक मतदारसंघांच्या माध्यमातून महाविकास आघाडीमधील हाय व्होल्टेज ड्रामा अजून शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. 


मविआचं 270 जागांवर एकमत 


दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांची गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा सुरु होती. अखेर यावर तोडगा निघाला असून 85-85-85 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. 270 जागांवर एकमत झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर 85-85-85 या जागांवर मिळून एकूण 270 जागांवर एकमत झालं आहे. उर्वरित 18 जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरु आहेत. या जागांवर आमच्यामध्ये स्पष्टता येईल. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्रात मविआचं सरकार येणार, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलाय. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Manoj Jarange: एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही, मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, 'या' तारखेला राजकीय समीकरण जुळवणार


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आरएसएसचा 288 जागांचा सर्व्हे, महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार, विधानसभा निवडणुकीत काय होणार?