मुंबई : महाविकास आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं (Shivsena) आघाडी घेतली आहे.  उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडून आज अधिकृत 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी, 40 पेक्षा जास्त उमेदवारांना शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर, आता उर्वरीत बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.


असे असले तरी उद्धव ठाकरेंच्या पहिल्या उमेदवार यादीत विदर्भात (Vidarbha) मात्र केवळ सात जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच्या यादीतील सात जागानंतर ठाकरे गटाचा विदर्भातील आकडा वाढेल का? असा प्रश्न या निमित्याने निर्माण झाला आहे. कारण महायुतीत भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला किमान 12 ते 14 जागा येत होत्या. त्यामुळे विदर्भाच्या जागेवरून मविआ झालेल्या प्रचंड काथ्याकुटीनंतर विदर्भाच्या वाट्याला अवघ्या सात जागा आल्याने हा आकडा वाढेल की ठाकरे सेनेला इटक्यावरच समाधान मानावे लागेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


विदर्भात सात जागांवरच शिवसेनेची बोळवण?


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणुकांसाठी 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असली, तरी त्यामध्ये विदर्भातील फक्त सात मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केले आहे. गेले काही दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विदर्भातील जागांसाठी काँग्रेस सोबत संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत होते. शिवसेना ठाकरे गट विदर्भातील जागांसाठी आग्रही आहे, असे सांगितले जात होते. मात्र शिवसेनेच्या यादीमध्ये विदर्भातील मेहकर, बाळापुर, अकोला पूर्व, वाशिम, बडनेरा, रामटेक आणि वणी या सात मतदारसंघांमध्येच शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहे.


त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या सात जागांवरच शिवसेनेची बोळवण करण्यात आली आहे? की आणखी काही जागा शिवसेनेला मिळतील हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. विशेष म्हणजे  जेव्हा शिवसेना ठाकरे गट भाजपसोबत महायुतीत निवडणूक लढवत होता तेव्हा शिवसेनेच्या वाट्याला 12 ते 14 मतदारसंघ येत होते. मात्र महाविकास आघाडीत ती संख्या अर्ध्यावर आली आहे का? असा प्रश्न आजच्या यादीनंतर निर्माण झालाय.


मराठवाड्यात किमान 15 शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत 


मराठवाडा हा शिवसेनाचा बालेकिल्ला. तर मराठवाड्यात 46 मतदारसंघ आहेत. मराठवाड्यात 2019 च्या निवडणूकित तत्कालीन शिवसेनेने 20 जागा लढवल्या, त्यात 12 ठिकाणी तत्कालीन शिवसेनेचे आमदार निवडून आले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपल्या पहिल्या यादीत मराठवाड्यातून बारा ठिकाणी उमेदवार जाहीर केले. तर शिवसेनेकडून 8 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या आठही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे. यात सर्वाधिक शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल छत्रपती संभाजीनगर मध्,ये याशिवाय किमान मराठवाड्यात 15 ठिकाणी तरी दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढताना पाहायला मिळेल.


एकट्या छ.संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या सहा जागा


छ.संभाजीनगर मध्य- उद्धव ठाकरे यांचे किशन चिंतनवाणी विरुद्ध शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल


छ.संभाजीनगर पश्चिम- शिवसेनेचे संजय शिरसाठ विरुद्ध उद्धव ठाकरे सेनेचे राजू शिंदे


वैजापूर -उद्धव ठाकरे यांचे दिनेश परदेशी विरुद्ध शिवसेनेचे रमेश बोरनारे


सिल्लोड- शिवसेनेचे अब्दुल सत्तार विरोधात उद्धव ठाकरे सेनेचे सुरेश बनकर


कन्नड उद्धव सेनेचे उदयसिंग राजपूत  विरोधात सेना पण अजून सेनेचे उमेदवार घोषणा नाही 


पैठण-सेनेचे विलास भुमरे विरोधात  उद्धव सेने उमेदवार घोषणा नाही


हे ही वाचा