एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चार वाघांकडून एका हरणाची शिकार, थरारक दृष्य कॅमेरात कैद
वाघ हा एकट्याने शिकार करतो, तर सिंह समुहाने शिकार करतात, मात्र चार वाघांनी मिळून एका हरणाची शिकार केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
नागपूर : साधारणपणे वाघ एकट्याने तर सिंह समुहात शिकार करतात. मात्र, नागपूरजवळच्या पेंच राष्ट्रीय उद्यानात वाघांच्या स्वभावाचा वेगळा पैलू आला समोर आहे. पेंचमधील तुरिया गेटजवळच्या परिसरात चार वाघांनी मिळून एका हरणाची शिकार केली आहे. एकाने हरणाचा पाठलाग केला तर इतरांनी घात लावून सोबत केली. संपूर्ण घटना डॉ दिपानी या पर्यटकाने त्याच्या मोबाईल कॅमेरात कैद केली असून या शिकारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आज सकाळी वाघाने केलेल्या शिकारीचे काही व्हिडीओ वायरल झाले होते. त्यामध्ये लंगडी या वाघिणीचे दोन वर्ष वयाचे दोन बछडे एका हरणाची शिकार करत असल्याचे दिसत होते. मात्र, डॉ दिपानी यांनी चित्रित केलेल्या व्हिडीओमध्ये या घटनेचा वेगळाच पैलू समोर आला आहे. त्यामध्ये चार वाघांचा चमू ही संपूर्ण शिकार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लंगडी वाघीण आणि तिचे चार बछडे जंगलाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जात असताना अचानक हरणांचा एक कळप समोर आला. तेवढ्यात काही हरणांनी त्यांच्या सवयीप्रमाणे एकमेकांना सावध करण्यासाठी आवाज करायला सुरवात केली. तेव्हाच लंगडी वाघिणीच्या चारही बछड्यांनी कळपातील एका मोठ्या हरणाचा पाठलाग सुरु केला.
हरिण वाघांना चकवू लागलं होतं. हे पाहून तीन वाघ नियोजनबद्द पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी गवतात लपले. तर एक वाघ हरणांचा पाठलाग करू लागला. अखेरीस चौघांपैकी दोन वाघांनी मिळून त्या हरणाला पकडले आणि उरलेले दोन वाघही त्या ठिकाणी पोहोचले. त्यामुळे पहिल्यांदाच वाघ समुहातही एक शिकार करत असल्याची ही दुर्मिळ घटना कैमऱ्यात कैद झाली आहे.
व्हिडीओ पाहा : चार वाघ मिळून एका हरणाची शिकार करतात तेव्हा...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement