नागपूर : राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा (Ganeshostav) उत्साह पाहायला मिळतोय. तर लाडक्या गौराईंचे (Gauri Aagaman) देखील थाटात आगमन करण्यात आलं. दरम्यान शुक्रवार (22 सप्टेंबर) हा दिवस गौरी पूजनाचा आहे. नागपूरचे राजे भोसले यांच्याकडील महालक्ष्मी (Mahalaxmi) या  नागपुरातील (Nagpur) सर्वात प्रथम स्थापन केलेल्या महालक्ष्मी आहेत. त्यांच्या घराण्यातील महालक्ष्मी या 315 वर्ष जुन्या आहेत. त्यामुळेच  नागपुरात पूजनाचा मान या महालक्ष्मींना आहे. तर नसवाला पावणाऱ्या अशी श्रद्धा भाविकांची असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे या महालक्ष्मींचं दर्शन घेण्यासाठी मध्य भारतातून भाविक येथे येत असतात. 


काय आहे या महालक्ष्मीचं गोष्ट?


शिवाजी महाराजांना एकाच ठिकाणीहून एवठं मोठं साम्रज्य सांभाळणं कठीण होत होतं. त्यामुळे त्यांनी रघुजी भोसले यांना नागपुरात येऊन कारभार सांभाळण्यास सांगितले. त्यानुसार रघुजी राजे प्रथम 1708 मध्ये नागपुरात आले आणि कारभार पाहु लागले. याच वर्षी त्यांनी या गणपती आणि महालक्ष्मींची स्थापना केली. त्यामुळं शहरात प्रथम पूजनाचा मान या महालक्ष्मींना आहे. या महालक्ष्मी चांदीच्या आहेत. राज घराण्यातील सर्व सदस्य सकाळी या महालक्ष्मींची विधिवत पूजाअर्चा करतात. त्यानंतर चांदीच्या ताटांमध्ये पंचपक्‍वानाचा नेवैद्य दाखवला जातो. 


महालक्ष्मींना जे दागिने घातले जातात ते रत्नजडीत असून 1708 काळापासून तेच दागिने दरवर्षी महालक्ष्मींना घातले जातात. या महालक्ष्मींच्या शेजारी शाही गणपती असतो. एकाच मूर्तीकाराकडून ही गणेश मूर्ती तयार केली जाते. या मूर्तीकारांची तेरावी पिढी राजे भोसले घराण्यातील हा गणपती घडवते. तसेच या गणपतीला राज घराण्यातील पगडी देखील घातली जाते. अगदी राजशिष्टाचाराप्रमाणे पालखीतून ही मूर्ती आणली जाते. गणपतीला आणायला रिद्धी सिद्धी देखील पालखीत जातात.


या महालक्ष्मी नवसाला पावणाऱ्या आहेत अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे फक्त विदार्भातून नाही तर मध्य भारतातून देखील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. अनेक भाविक दरवर्षी नित्यनेमानं दर्शनासाठी येतात. तर काही भाविक हे या गणपती आणि महालक्ष्मींची महती ऐकून दर्शनासाठी येतात. त्यामुळे दरवर्षी या गणपतीच्या आणि महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढतच जात आहे. राज घराण्यातील या महालक्ष्मी असल्यामुळे त्यांना शाही महालक्ष्मी असं संबोधलं जातं. राजे भोसले यांच्या राजवाड्यातही आजच्या दिवशी एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. तर गौरी आगमनाच्या दोन दिवसांमळे राजघराण्यामध्ये अगदी भक्तीमय वातावरण असतं. 


हेही वाचा : 


नागपुरातील टेकडी गणपती मंदिरात निर्माल्यापासून सुगंधित धूप कांडी, महिलांना मिळाला हक्काचा  रोजगार