Nagpur Accident News: काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी म्हण आपल्या सर्वांना परिचयाची आहेच. मात्र याच म्हणीचा प्रत्यय नागपुरात (Nagpur) आला आहे. त्याचं झालं असं की, नागपुरात दुचाकीवरुन जात असलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याच्या डोक्यात निर्मणाधीन पुलाची सळई डोक्यात घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या नंतर या चिमुकल्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॅाक्टरांनी शस्रक्रिया करुन सळई बाहेर काढली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचे प्राण वाचलेत. यानंतर या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपुरात दुचाकीवरुन जात असलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या डोक्यात निर्माणाधीन पुलाची सळई घुसली आणि मोठी दुर्घटना घडली. डॅाक्टरांनी शस्रक्रिया करुन सळई बाहेर काढली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचे प्राण वाचवले. याप्रकरणी कंत्राटदारावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
नागपूरातील तीन वर्षिय मुलाच्या डोक्यात सळई घुसल्याची घटना नागपुरात सात दिवसांपूर्वीच घडली. नागपुरातील पारडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. नागपुरातील एका निर्माणधीन पुलाची सळई खाली पडली आणि ती पुलाखालून गाडीवरुन आपल्या आई-वडिलांसोबत जाणाऱ्या एका तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या डोक्यात घुसली. तात्काळ चिमुकल्याला दवाखान्यात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत चिमुकल्याला जीवनदान दिलं आणि सळई त्याच्या डोक्यातून बाहेर काढून चिमुकल्याला जीवनदान दिलं आहे. सध्या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते गुड्डू रहांगडाले यांच्याकडून चिमुकल्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली आहे.