Nagpur Railway Station : उड्डाणपुलाखालील चार दुकाने भुईसपाट, सहा पदरी मार्ग निर्मितीच्या कामाला वेग
नुकसान भरपाई घेण्यास तसेच मेट्रोने तयार केलेल्या मॉलमध्ये जाण्यास संमती देणाऱ्या दुकानदारांची दुकाने तोडण्यात येत आहे. येथे 160 दुकानदार असून 44 जण न्यायालयात गेले आहेत.
नागपूरः रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मानस चौक (Manas Chowk) ते जयस्तंभ चौकापर्यंत सहा पदरी रस्ता प्रस्तावित आहे. यासाठी गणेश टेकडी (Ganesh Tekdi Nagpur) उड्डाणपुलाखालील दुकानांचे शटर काढण्यास सोमवारी सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत 66 दुकानांचे शटर काढण्यात आले असून चार दुकानेही भुईसपाट (Shops demolished) करण्यात आली. नुकसान भरपाई घेण्यास तसेच मेट्रोने (Maha Metro) तयार केलेल्या मॉलमध्ये जाण्यास संमती देणाऱ्या दुकानदारांची दुकाने तोडण्यात येत आहे. येथे 160 दुकानदार असून 44 जण न्यायालयात गेले आहेत.
गणेश टेकडी पूल पाडणे, दुकानदारांना त्यांची अनामत रक्कम (security deposit) आठ टक्के व्यायाने परत करणे, मेट्रो मॉलमध्ये दुकानदारांसाठी पर्यायी जागा देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे. या गणेश टेकडी उड्डाणपुलाखाली 175 दुकाने असून 30 वर्षांसाठी महानगरपालिकेने लिजवर दिली होती. परंतु या पुलामुळे रेल्वे स्टेशनवर जाताना वाहतूक कोंडी होत असल्याने पूल पाडून सहा पदरी रस्ता बांधण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या रस्त्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी निधीही मंजूर केला. महापालिकेने येथील 160 दुकानदारांना नोटीस बजावली होती. या दुकानदारांची सुनावणी घेण्यात आली. यातील 47 दुकानदारांनी नुकसान भरपाई स्वरुपात अग्रिम जमा रक्कम व्याजासह परत मागितली तर 30 दुकानदारांनी महामेट्रोच्या मॉलमध्ये (Nagpur Metro Mall) जाण्यास उत्सुकता दर्शविली. दरम्यान, ज्या दुकानदारांनी महापालिकेच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला, त्यांच्या दुकानांचे शटर काढण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. येथील 66 दुकानांचे शटर काढण्यात आले.
दुकान तोडण्याचा कामाला वेग, आठ दिवसांत तोडणार 66 दुकाने
मेट्रोच्या यंत्रणेने आजपासून दुकाने तोडण्यास सुरुवात केली. आज चार दुकाने तोडण्यात आळी. महामेट्रोच्या (Maha Metro) कामाचा वेग बघता येत्या आठ दिवसांत 66 दुकाने तोडण्याची शक्यता आहे. परंतु, काही दुकानदार न्यायालयात गेले तर संपूर्ण दुकाने तोडण्यात अडथळा येण्याचीही शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या