नागपूर: पर्यावरण रक्षण ही एका व्यक्ती किंवा संस्थेची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षणासाठी अनेक घोषणा करण्यात येतात. मात्र त्या फक्त घोषणाच ठरतात. त्याची प्रत्यक्षात कृती होत नाही. त्यामुळे पर्यावरणासाठी काम करणाऱ्यांचे शब्द आणि कृतीत साम्य असावे असे प्रतिपादन देशाचे वॉटरमॅन म्हणून प्रसिद्ध राजेंद्र सिंह यांनी केले. लोकमान्य तिलक जनकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ़ इंजीनियरिंग आणि नेशनल एनवायर्नमेंटल इंजीनियरिंग रिसर्च इंस्टिट्यूट आणि एन्हान्सिंग ग्रीन इकॉनमी फॉर एशिया या बॅनर अंतर्गत 'शाश्वततेसाठी हरित उपक्रम स्वीकारणे' आंतरराष्ट्रीय चर्चासत्र चे  आयोजन संस्थेच्या केंद्रीय सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.


या  चर्चासत्रात सहा युरोपीय देश आणि तीन आशियाई देशांतील प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठांचे सुमारे 35 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. हरित उपक्रमांच्या क्षेत्रातील उदयोन्मुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि व्यावसायिकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आईसीएजीआईएस-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारोहाला प्रामुख्याने भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंघ यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून शैक्षिक सलाहकार, बेसल, स्विट्ज़रलैंड, प्रो. कार्लोस ओवीजी यूनिवर्सिटी ऑफ मैगडेबर्ग, जर्मनी प्रो. जुलियाना हिफ संस्थेचे संचालक अभिजीत देशमुख, आभियांत्रिकी संचालक डॉ. विवेक नानोटी, प्राचार्य डॉ. श्रीकृष्णा  ढाले, उप-प्राचार्य डॉ. गजेंद्र आसुटकर, सयोजक डॉ. सुमिता  राव, डॉ. मंजू सोनी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 


कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्याची गरज


प्रो. कार्लोस म्हणाले, हरित प्रकल्पाच्या तीन वर्षांमध्ये संपूर्ण संघ हरित अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध पैलूंचा उपयोग करू शकतो. राष्ट्रे आणि जगातील सर्वोच्च उदात्त आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सार्वत्रिक उपायांचा अवलंब केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रो. ज्युलियाना हिफ यांनी आशियातील हरित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांच्या प्रकल्पाद्वारे हाती घेतलेल्या विविध उपक्रमांविषयी सांगितले. कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्यासाठी हरित व्यवसाय धोरणांचा जलद अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सुचवले.


पर्यावरण संरक्षणाच्या उपाय योजना कमी पडल्या


अभिजीत देशमुख म्हणाले की, जरी पर्यावरणवाद्यांनी सार्वत्रिक उपाययोजना केल्या आहेत. परंतु दुर्दैवाने हे कमी सिद्ध होत आहे की घट होण्याचा दर संरक्षणात्मक उपायांपेक्षा वेगवान आणि अधिक धोकादायक आहे. डॉ.विवेक नानोटी यांनी शाश्वत विकासासाठी सर्जनशील कल्पनांच्या देवाणघेवाणीसाठी नेटवर्किंगच्या गरजेवर भर दिला. या दोन दिवसीय संमेलनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. श्रीकृष्णा ढाले यांनी या संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. भविष्यातही अशा सर्व सुधारणा कार्यक्रमांना महत्त्व दिले जाईल ज्याचा केवळ प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनाच नाही तर मानवतेलाही फायदा होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. सुमिता राव यांनी स्वागतपर भाषण केले आणि या परिषदेची जास्तीत जास्त माहिती तज्ञांकडून घेण्याचे आवाहन प्रतिनिधींना केले. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मयूरी चांडक, डॉ. वैशाली सोमन, डॉ. प्रशांत आडकीने, प्रो. सतीश तिवारी यांनी परीश्रम घेतले. तर उपस्थितांचे आभार डॉ. मंजू सोनी यांनी मानले.


महत्त्वाच्या बातम्या


MBBS Students : तीन महिन्यांपासून मानधन नाही, लता मंगेशकर रुग्णालयातील आंतरवासित डॉक्टर तीन दिवसांपासून संपावर


Intresting : तब्बल 34 वर्षांनंतर 29 आंदोलकांना वॉरंट, 1988 मध्ये रोखली होती 'विदर्भ एक्स्प्रेस'


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI