MBBS Students : तीन महिन्यांपासून मानधन नाही, लता मंगेशकर रुग्णालयातील आंतरवासित डॉक्टर तीन दिवसांपासून संपावर

अक्षय गांधी Updated at: 24 Aug 2022 03:14 PM (IST)
Edited By: अक्षय गांधी

25 मे पासून रुजू झालेल्या 150 डॉक्टरांना तीन महिन्यापासून मानधन देण्यात आले नाही. याच्या संतापासून डॉक्टरांनी सायलेंट प्रोटेस्टचा मार्ग निवडला आहे. सोमवारपासून पुकारलेल्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे.

महाविद्यालय परिसरातील 'डिन पोर्च'मध्ये एमबीबीएस आंतरवासित 'सायलेंट प्रोटेस्ट' करत आहेत.

NEXT PREV

नागपूरः राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांच्या तलनेत अल्प मानधन, त्यातही तीन महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याने नागपुरातील डिगडोह परिसरातील एन.के.पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर रुग्णालयातील आंतरवासित डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यात 150 एमबीबीएस डॉक्टरांचा समावेश असून 25 मे पासून आतापर्यंतचा सुमाने 3 महिन्यांचा माधन अद्याप मिळाला नाही आहे.


एमबीबीएसची पदवी पूर्ण केल्यावर एक वर्षांसाठी  आंतरवासिता म्हणून सेवा द्यावी लागते. त्यानंतर पदवी प्रदान करण्यात येते. पूर्ण क्षमतेने वैद्यकीय सेवा देऊनही रुग्णालयात राज्यातील इतर खासगी वैद्यकीय रुग्णालयाच्या तुलनेत कमी मानधन देण्यात येते.


RTO Nagpur : दुचाकी वाहनाकरीता नवीन मालिका सुरु, ऑनलाइन प्रक्रियेमुळे डीलरशिपमध्येच वाहनांची नोंदणी


साप्ताहीक सुटीचे पैसे ही वजा


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आंतरवासिता म्हणून सेवा देणाऱ्यांना महिन्याला 11 हजार रुपये, तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत सात ते साडेसात हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु नागपुरातील एन.के.पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर रुग्णालयातील विद्यार्थ्यांना मात्र शंभर रुपये प्रतिदिवस मानधन देण्यात येते. त्यातही एक साप्ताहिक सुट्टीचा दिवस वजा करुन डॉक्टरांना केवळ अडीच हजार रुपये देऊन बोळवण केली जाते.


अनेक निवेदन देऊनही दुर्लक्ष


आंतरवासिता डॉक्टरांनी वेळोवेळी महाविद्यालय प्रशासनाला मानधन वाढविण्यासाठी विनंती केली. दुसरीकडे 25 मे पासून रुजू झालेल्या सुमारे 150 डॉक्टरांना तीन महिन्यापासून मानधन देण्यात आले नाही. याच्या संतापासून डॉक्टरांनी सायलेंट प्रोटेस्टचा मार्ग निवडला आहे. सोमवारपासून पुकारलेल्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे.


रुग्णसेवा प्रभावित


तब्बल 150 आंतरवासिता डॉक्टर संपावर असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय सेवेवरही याच परिणाम झाला आहे. संपाद्वारे वैद्यकीय सेवा प्रभावित करणे आमचा उद्देश नसून आमच्या मागण्याही मुलभूत आहेत. वैद्यकीय सेवा देण्यात आम्ही कधीही मागे हटत नाही मात्र इतर महाविद्यालयांच्या तुलनेत कमी मानधन आणि मिळणारे मानधनही वेळेवर मिळत नाही. याद्वारे आमचा एकप्रकारे छळ केला जात असल्याची प्रतिक्रीया नाव न उघड करण्याच्या अटीवर एका आंतरवासिताने 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


Intresting : तब्बल 34 वर्षांनंतर 29 आंदोलकांना वॉरंट, 1988 मध्ये रोखली होती 'विदर्भ एक्स्प्रेस'


मानधन वाढीवर कार्यकारी अध्यक्षांशी चर्चा


विद्यार्थ्यांच्या मानधन वाढविणे संदर्भात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आशिष देशमुख यांची भेट घेतली असून यावर सर्वेक्षणानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ. विलास ठोंबरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.



सध्या महाविद्यालयात एनएमसी (नॅशनल मेडिकल कमिशन)चा सर्वेक्षण होणार आहे. प्रशासन त्याच्या तयारीत लागले आहे. तसेच आंतरवासितांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक आहे. आंतरवासितांची ही नवी तुकडी असल्याने विद्यार्थ्यांची हजेरी विविध विभागातून मागविणे तसेच इतर प्रशासकीय प्रक्रियेमुळे मानधन देण्यात उशीर झाला आहे. आता प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील एक ते दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित रक्कम जमा होईल.- डॉ. विलास ठोंबरे, उप अधिष्ठाता, लता मंगेशकर महाविद्यालय व रुग्णालय


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI
Published at: 24 Aug 2022 03:14 PM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.