नागपूरः शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियाड परीक्षांचे सर्वात मोठे आयोजक असलेल्या सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनने (SOF) या वर्षी 15 सप्टेंबर 2022 पासून ऑलिम्पियाड परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. विद्यार्थी त्यांच्या शाळांद्वारे एसओएफ ऑलिम्पियाड परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील नागपुरातून (Nagpur) सुमारे 1,19,000च्य वर  विद्यार्थी  एसओएफ ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होत आहेत.


सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन यावर्षी 7 विषयांमध्ये ऑलिम्पियाड परीक्षा आयोजित करणार आहे ज्यात एसओएफ इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड, एसओएफ इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड, एसओएफ नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड, एसओएफ इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड, एसओएफ नॅशनल सायबर ऑलिम्पियाड, एसओएफ इंटरनॅशनल सोशल स्टडीज ऑलिम्पियाड आणि एसओएफ इंटरनॅशनल सोशल स्टडीज ऑलिम्पियाड यांचा समावेश आहे.


SOF परीक्षेसाठी 68 देशांमधील 68,000 शाळांची नोंदणी


इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड भारत सरकारशी संलग्न असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या (Institute of Company Secretaries of India) सहकार्याने आयोजित केले जाईल. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते. एसओएफ नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडसाठी 'माईक्लासरूम' सह सहयोग करते, ते जेईई, एनईईटी, सीयूईटी आणि कैट साठी विद्यार्थ्यांना तयार करते. सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनचे संस्थापक आणि संचालक महाबीर सिंग म्हणाले की, या वर्षीच्या परीक्षा ऑफलाइन घेतल्या जातील, एसओएफ ऑलिम्पियाड परीक्षा ही जगातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी ऑलिम्पियाड परीक्षा आहे. 2021-22 मध्ये, 68 देशांमधील 68,000 हून अधिक शाळांनी एसओएफ परीक्षेसाठी नोंदणी केली आणि लाखो विद्यार्थी त्यात बसले. विजेत्या विद्यार्थ्यांना पदके आणि शिष्यवृत्ती दिली जाते.


इतर महत्त्वाच्या बातम्या


MBBS Students : तीन महिन्यांपासून मानधन नाही, लता मंगेशकर रुग्णालयातील आंतरवासित डॉक्टर तीन दिवसांपासून संपावर


Nagpur Orange Crop Loss : 70 टक्के संत्र्याचे पीक गळणार, यंदा रसाळ संत्री खायला मिळणार नाहीत?