नागपूर. विदर्भ एक्स्प्रेस सुटण्याची वेळ बदलण्याच्या मागणीसह 34 वर्षांपूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावर मोठे आंदोलन केले गेले. थेट रेल्वेच रोखून धरली गेली होती. त्यावेळी आंदोलनकर्त्यांना ताब्या घेऊन सोडून दिले गेले होते. काळाच्या ओघात हे आंदोलन साऱ्यांच्याच विस्मृतीत गेले. आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांच्याही आठवणी धुसर झाल्या. लोहमार्ग पोलिस दलाने हे प्रकरण आता उखरून काढले आहे. 29 आंदोलकांना वॉरंट बजावण्यात आले आहे. अऩेकजण वृद्धावस्थेत असून काहींचा मृत्यूही झाला आहे.


1988 मध्ये विदर्भ एक्स्प्रेस नागपूरहून मुंबईला दुपारी 3 वाजता रवाना व्हायची आणि पहाटे मुंबईला पोहोचायची. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गाडी नागपूरहून सायंकाळी 5 वाजता सोडली जावी आणि सकाळी 7 ला मुंबई स्थानक गाठेल अशी तजविज करावी, त्यामुळे गैरसोय कमी होऊ शकेल, अशी मागणी नागपूरकरांनी लावून धरली होती. त्यासाठी मार्च 1988 मध्ये नागपूर रेल्वे स्थानकावर मोठे आंदोलन झाले होते. काही उत्साही कार्यकर्त्यांनी ट्रेन थांबवली. पोलिसांनी कडक कारवाई करताना लाठीचार्जही केला. शेकडो आंदोलकांना ताब्यात गेऊन पोलिस लाईन टाकळी येथे ठेवण्यात आले. आंदोलन करणारे काँग्रेस, सेवादल आणि अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सर्व शांत झाले. प्रकरण मार्गी लागले. असा सर्वांचाच समज होता. पण, आता तब्बाल 34 वर्षांनी कायदेशीर प्रक्रियेचा ससेमीरा मागे लागल्याने संबंधितांवर धावपळ करण्याची वेळ आली आहे. 


खासदार कृपाल तुमाने, धवड, पांडे यांना वॉरंट


त्यावेळी या आंदोलनात सहभागी असणारे विद्यमान खासदार कृपाल तुमाने, तत्कालीन आमदार अशोक धवड, दिवंगत उमेश चौबे, काँग्रेस सेवादलाचे निमंत्रक कृष्णकुमार पांडे, शिरीष दुप्पल्लीवार, दीपक यादव, बजरंगसिंग परिहार, चंद्रकांत गोहणे, विजय विश्वकर्मा, सिंधुताई बांते, हाजी इसाकभाई नाशिककर, रामदेव गोवंडे, सुभाष मसुरकर यांच्यासह 29 जणांना रेल्वे कोर्टाने वॉरंट बजावले आहे. हजर राहण्याच्या सूचनेसह जामिनासाठी 5 हजारांचा जातमुचलका भरण्यास सांगण्यात आले आहे.


राज्यात धर्मांतराचं रॅकेट, धर्म आणि जातीनुसार त्यांच रेटकार्ड, नितेश राणे यांचा गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीस म्हणाले...


रेल्वे स्थानकावरील आंदोलन


नुकतेच केंद्र सरकारच्या अग्नीविर योजनेच्या विरोधातही देशभरात विविध ठिकाणी राजकीय पक्षांकडून आंदोलने करण्यात आली. यामध्ये तरुणांना रोको आंदोलनही केले. यात नागपुरातही राजकीय पक्षाच्या युवा सेलच्यावतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वात सामान्य कार्यकर्ता आंदोलन करतो मात्र त्याचे भविष्यातील परिणाम काय होतील याचा अंदाज या वरील घटनेवरुन लावता येतो. त्यामुळे तरुणांनी आपल्या भविष्याचा विचार करुन नेत्यांच्या मागे फिरावे, असे मत अनेक आंदोलने गाजवलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केला.


RTO Nagpur : दुचाकी वाहनाकरीता नवीन मालिका सुरु, ऑनलाइन प्रक्रियेमुळे डीलरशिपमध्येच वाहनांची नोंदणी