Emergency Landing at Nagpur Airport : ओमानच्या (Oman) विमानाचं नागपूरमध्ये (Nagpur Airport) इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आलं आहे. ओमानच्या सलाम एअरलाईन्सच्या (Salam Airline) विमानाचं नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing at Nagpur Airport) करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान बांगलादेशातील चातगावहून मस्कतला जात होते. यावेळी नागपूर विमानतळावर याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात (Salam Airlines Flight Emergency Landing) आलं असून विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
नागपुरात विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या (Oman) सलाम एअरलाईन्सच्या विमानाने (Salam Airlines Flight) बांगलादेशच्या (Bangladesh) चाट्टोग्राम (Chattogram) येथून मस्कत (Muscat) ला जाण्यासाठी उड्डाण केलंय मात्र या विमानात तांत्रिक बिघाड (Technical Failure in Aircraft) झाल्याने हे विमान नागपूर विमानतळावर उतरवण्यात आलं. विमानाच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागल्याने नागपूर विमानतळावर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
एअरलाईन कर्मचाऱ्यांसह सर्व प्रवासी सुखरुप
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलाम एअरलाईनच्या विमानाचं बुधवारी (1 मार्च) रात्री नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. वैमानिकाला विमानाच्या इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याचं आढळून आलं. या विमानात सुमारे 200 प्रवासी आणि सात क्रू मेंबर्स होते. सर्व एअरलाइन कर्मचाऱ्यांसह सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
ओमानच्या सलाम एअरलाईन्सच्या विमान
नागपूर विमानतळावर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आलं. हे विमान ओमानच्या (Oman) सलाम एअरलाईन्सचं (Salam Airline) आहे. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. विमानतळाचं तांत्रिक पथक विमानाची तपासणी करत आहे. यासोबतच प्रवाशांना आवश्यक सुविधाही पुरवल्या जात आहेत.
भारतीय हवाई हद्दीत असताना विमानात तांत्रिक बिघाड
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान बांगलादेशातील चातगाव येथून मस्कतला जात होते. विमान भारतीय हवाई हद्दीत असताना त्याच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचं आढळलं. त्यानंतर विमान नागपूर विमानतळाच्या दिशेनं वळवण्यात आलं. विमानतळ कर्मचाऱ्यांनीही वेळेत सर्व तयारी केली आणि विमानाची सुरक्षित इमर्जन्सी लँडीग करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास आणि चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :