नागपूर :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महात्मा फुले विकास महामंडळाच्या वतीने सुधारित निर्धुर चूल वाटपाचा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला. अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना सुधारित निर्धुर चुलीचे वाटप जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मोहित गेडाम, एन-किल इंटरनॅशनलचे गोयल, महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापक देवतळे यावेळी उपस्थित होते.


महात्मा फुले विकास महामंडळाचे संचालक विपीन श्रीमाळी यांच्या मार्गदर्शनात  महाप्रीत कंपनीतर्फे या चुलीचे वाटप करण्यात आले. थर्मल पावरचा वापर करुन ही चुल तयार करण्यात आली असून पालापाचोळा व सरपन व काड्यांवर ही चुल पेटते. त्यामुळे धुर होत नाही. यावेळी पन्नास अनुसूचित प्रवर्गातील लाभार्थ्यांना निर्धुर चुलीचे वाटप करण्यात आले. त्यासोबत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापक यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


गॅस नसलेल्यांना मिळणार चुल


महागाईच्या काळात गॅस सिलेंडर घेणे फार जिकरीचे झाले आहे. त्याऐवजी निर्धुर चुलीचा वापर केल्यास पैशाची बचत होते व चुलीमुळे धुर होत नसल्याने  महिलांच्या आरोग्यास हानी होत नाही. यामुळे याचुलीचा लाभ अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. ज्यांच्याकडे गॅस सिलेंडर नाही अशाच लाभार्थ्यांना ही चुल मिळणार आहे. यासाठी जातीचा दाखला, आधारकार्ड व रेशन कार्डच्या साक्षांकित प्रती व छायाचित्र  अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.


Azadi Ka Amrit Mahotsav : जिल्ह्यात 7 लाख 66 हजार घरांवर डौलाने फडकतोय तिरंगा


17 आगस्टपर्यंत एकदा अवश्यक भेट दया...MaharashtraNagpurIndependence DayNagpur NewsIndependence Day 2022


नागपूर: आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाजन विभीषिका प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन 17 तारखेपर्यंत खुले असणार आहे. या प्रदर्शनात भारत पाकिस्तान फाळणीचे सचित्र दर्शन नागरिकांना होणार आहे. धार्मिक आधारावर लार्ड मॉउंडबेटन यांनी केलेल्या फाळणीमुळे जीवनशैली, अस्तित्व यामध्ये अचानक कसे बदल झाले. मानसिकता नसतांना ही फाळणी लादल्या गेली. त्यावेळची नेमकी स्थिती काय होती. 2 जून 1947 प्रत्यक्षात फाळणीला मंजूरी देण्यात आली, या फाळणीमुळे  लोकांच्या मनात भिती व हिंसा यांची एकत्र स्थिती उद्भवली होती, फाळणीमुळे झालेल्या ऐतिहासिक बैठका,याची प्रचिती या प्रदर्शनामुळे आपणाला कळणार आहे. ही माहिती बघणे अंगावर काटा आणते. त्यामुळे हा ऐतिहासिक ऐवज बघण्यासाठी आपल्या मुलांसह कुटुंबाने यावे असेही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. हे प्रदर्शन 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट यादरम्यान सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी नि:शुल्क आहे.