नागपूर : शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाला जिल्ह्याच्या प्रत्येक घरातून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. अनेक नागरिकांनी सुर्योदयालाच घरावर तिरंगा फडकवण्यास सुरुवात केली. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या माहितीनुसार 7 लाख 66 हजार घरांवर तिरंगा डौलाने फडकत असल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षामध्ये केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत घरांघरावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण भागात आज 2 लाख 55 हजार 341 तर शहरी भागात 2 लाख 35 हजार 316 घरांवर तिरंगा लावण्यात आले आहे. शासकीय कार्यालय व दुकाने, शहरी भागात तिरंग्याची संख्या 38 हजार आहे. ग्रामीण भागात ही संख्या 1785 आहे.
PM Modi Speech Highlights : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे; आत्मनिर्भर भारत, भ्रष्टाचार, पंचप्राणासह 'या' मुद्द्यांवर भाष्य
विशेष म्हणजे सर्व नागरिकांकडून ध्वजसंहितेचे पालन होत असून एकही प्लॅस्टीक किंवा कागदी झेंडा लावलेला प्रशासनाच्या निदर्शनास अद्याप आलेला नाही. दरम्यान जिल्ह्यातील बहुतेक शासकीय कार्यालयावर तिरंगी रोषणाई करण्यात आली असून स्वराज्य महोत्सवाअंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयाची साफसफाई करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयास ध्वजसंहिता नियमाप्रमाणे सकाळी ध्वज फडकावून सध्याकाळी उतरविणे अत्यावश्यक आहे. तथापि घरासाठी ही ध्वजसंहिता लागू राहणार नाही, 13 ऑगस्टला सकाळी झेंडा उभारुन 15 ऑगस्टला सायंकाळी सन्मानाने तो उतरवावा. परंतु ध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे.
नागरिक अन् पोलिसांमधील संवाद वाढविण्यासाठी माहितीचे प्रदर्शन आवश्यक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ध्वज (तिरंगा) ग्रामपंचायत, पंचायत समिती, स्वस्त धान्य दुकान व काही ठिकाणी बचत गटाकडे उपलब्ध आहेत. त्यासोबत प्राधान्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येईल. शाळामध्ये एकाच घरातील दोन व जास्त भावंड असल्यास दोघांना मिळून एकच तिरंगा वाटप करण्यात आले. आपला तिरंगासोबतचा फोटो नागरिकांनी या https://harghartiranga.comसंकेतस्थळावर अपलोड करावा असेही आवाहन करण्यात आले.
Nitn Gadkari : 'बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात', नितीन गडकरींची तुफान बॅटिंग
देशभक्तीचा माहौल
अमृत महोत्सव फक्त शासकीय कार्यालय अन् घरांपुरताच मर्यादीत नसून खासगी आस्थापने, दुकाने, बँक, हॉटेल आदींमध्येही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच सर्वत्र तिरंगा ध्वज फडकत आहे. तर तरुणाईमध्येही खास उत्साह संचारला असल्याचे दिसून येत आहे.