नागपूर : जिल्ह्यात सिगारेट चोरीचा एक आगळं वेगळं प्रकरण समोर आला आहे. या प्रकरणात अज्ञात चोरट्यांनी भोपाळ ते रायपूर दरम्यान वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून थोडी थोडकी नव्हे तर तब्ब्ल चार कोटी रुपयांची सिगारेट लंपास केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पोलिस याचा तपास करत आहे.

भोपाळवरुन कोट्यवधींची सिगारेट घेऊन रायपूरच्या दिशेने निघालेले हे ट्रक/कंटेनर काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील नांदा शिवारात बेवारस स्थितीत आढळले होते. तेव्हा प्रकरणाचे सत्य समोर आले नव्हते. मात्र, दोन दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून एका ट्रक मालकाने पोलीसांना संपर्क साधून त्यांचे कोट्यवधींची सिगारेट वाहून नेणारे (सीजी 04 एमटी 5271)क्रमांकाचे ट्रक बेपत्ता असल्याचे कळवले. तेव्हा नांदा परिसरात बेवारस उभे असलेले ट्रक सिगारेट वाहतूक करत होते आणि त्याच्यातून चार कोटींची सिगारेट लंपास झाल्याचा खुलासा झाला.

हेही वाचा - बिग बींसमोर सिगरेट प्यायलेली चालेल? आमीरने मागितला शाहरुखचा सल्ला

ट्रकचे अपहरण करुन कोट्यवधींची लूट :

मध्यप्रदेशातील रायेसन मधील रिलायबल सिगारेट एन्ड टोबेको इंडस्ट्रीज मधून हे ट्रक सिगारेटचे 656 मोठे बॉक्स घेऊन रायपूरच्या दिशेने निघाले होते. मात्र, निश्चित वेळेला रायपूरला न पोहोचता हे ट्रक बेपत्ता झाले होते. मार्गावर सर्वत्र शोध घेतल्यानंतर ते नागपूर जिल्ह्यात नांदा परिसरात निर्जन ठिकाणी बेवारस उभे आढळले. पोलीसांनी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 18 डिसेंबरला दोन महिंद्रा एक्सयूव्ही वाहनांनी संबंधित ट्रकचा पाठलाग करुन त्याचे अपहरण केले. त्यानंतर दोन रिकामे ट्रक आणून एका निर्जन ठिकाणी चार कोटींची सिगारेट त्या दोन ट्रकमध्ये लोड केली. त्यानंतर या ट्रक अमरावती मार्गे भुसावळला नेल्याचे समजले आहे. त्यामुळे रायपूरवरुन निघालेली आणि भोपाळला जाणारी चार कोटींची सिगारेट चोरुन भुसावळला कोणी नेली? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

हेही वाचा - सिगरेट न दिल्याने कल्याण स्टेशनबाहेर मद्यधुंद तरुणींचा गोंधळ

हेही वाचा - आधी बिडी द्या, खड्डयातून बाहेर काढलेल्या आजोबांची तलफ!

Galor Gang | Wooden Slingshot | काच फोडून कारची चोरी, औरंगाबादमध्ये टोळी गजाआड | ABP Majha