नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे अखेर आज सूप वाजलं. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचं हे पहिलंच अधिवेशन. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा देखील पहिला अनुभव. समोर भाजपसारखा तगडा विरोधी पक्ष असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेत हे आव्हान पेलले. 15 डिसेंबरला सुरु झालेलं हे अधिवेशन आज संपले. आता पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारी, 2020 पासून मुंबई येथे सुरु होणार आहे.


या हिवाळी अधिवेशनात महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, गोरगरीबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन योजना , पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प, समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार पैसा देणार, समृद्धी महामार्गालगतच्या विकास प्रकल्पातून पाच लाख रोजगार निर्माण करणार, कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना अशा निर्णयासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सोबतच अधिवेशनात सात महत्वाची विधेयकं सुद्धा मंजूर करण्यात आली.

दोन्ही सभागृहात संमत विधेयकांची यादी

(1) सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र.43 - महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, 2019, (ग्राम विकास विभाग) (पीठासीन अधिकाऱ्यांची पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास त्यांची कर्तव्ये चार महिन्यांहून अधिक नसेल इतक्या कालावधीकरिता देण्याची तरतूद) (अध्यादेश क्रमांक 21/2019 चे रूपांतर) (पुर:स्थापित दि. 16.12.2019) (विधानसभेत संमत दि. 17.12.2019) (विधान परिषदेत संमत दि. 18.12.2019)

(2) सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र.44 - महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता (सुधारणा) अध्यादेश, 2019 (ग्राम विकास विभाग) (अधिनियमातील अनर्हतेबाबतच्या तरतुदी नगर पंचायतीच्या सदस्यांना देखील लागू होण्याकरिता सुधारणा) (अध्यादेश क्रमांक 17/2019 चे रूपांतर) (पुर:स्थापित दि. 16.12.2019) (विधानसभेत संमत दि. 17.12.2019) (विधान परिषदेत संमत दि. 18.12.2019)

हेही वाचा - शेतकरी कर्जमाफी, 10 रुपयांत शिवभोजन, मुख्यमंत्र्यांकडून शेवटच्या दिवशी घोषणांचा पाऊस

(3) सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र. 45 - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय, समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अध्यादेश, 2019, (ग्राम विकास विभाग) (जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय, समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे.) (ग्राम विकास विभाग) (अध्यादेश क्रमांक 22/2019 चे रूपांतर) (पुर:स्थापित दि. 16.12.2019) (विधानसभेत संमत दि. 17.12.2019) (विधान परिषदेत संमत दि. 18.12.2019)

(4) सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र. 46 - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश, 2019, (महसूल ववन विभाग) (गौण खनिजे बेकायदेशीर पणे काढल्यास व त्यांची वाहतूक करण्याकरिता वापरलेली यंत्रसामग्री व साधन सामग्री सरकार जमा करण्याचे अधिकार सर्व महसुली अधिकाऱ्यांना प्रदान करणे ) (अध्यादेश क्रमांक 24/2019 चे रूपांतर) (पुर:स्थापित दि. 16.12.2019) (विधानसभेत संमत दि. 17.12.2019) (विधान परिषदेत संमत दि. 18.12.2019)

(5) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 49- महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०१९ (वित्त विभाग) (विधानसभेत व विधान परिषदेत संमत दि. 20.12.2019)

हेही वाचा - शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा


(6) सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र. 47- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2019 (पुर:स्थापित दि. 19.12.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 20/21.12.2019) (विधानसभेत व विधान परिषदेत संमत दि. 21.12.2019)

(7) सन 2019 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्र.48- महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2019 (नगर विकास विभाग) (महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातून एक पालिका सदस्य निवडला जाईल अशी तरतुद करणे) (पुर:स्थापित दि. 19.12.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 20/21.12.2019) (विधानसभेत व विधान परिषदेत संमत दि. 21.12.2019)

VIDEO | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'या' दहा महत्वाच्या घोषणा केल्या